मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील राजस्थान रॉयल्सचा संघ, 1 ऑगस्ट रोजी फ्रँचायझीच्या वर्षं 2019 मधील प्रवासावर माहितीपट मालिका (डॉक्यूमेंटरी) प्रदर्शित करणार आहे. याबद्दल संघाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘इनसाइड स्टोरी’ नावाची तीन भागांची मालिका जिओ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.
राजस्थान रॉयल्सने मागीलवर्षी आयपीएलमध्ये आठ संघांच्या गुणतालिकेत सातवे स्थान मिळविले होते. या माहितीपटाच्या प्रकाशनावर बोलताना राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेक लॅश मॅकक्रिम म्हणाले की, “या कठीण काळात राजस्थान रॉयल्सच्या चाहत्यांचे आणि जगातील क्रीडाप्रेमींचे मनोरंजन करण्यासाठी हा माहितीपट प्रसिद्ध करताना आम्हाला आनंद होईल.”
Unseen, unfiltered, unmissable. 1 week to go. ⏳
A season with the Royals Family, premiering on @OfficialJioTV. 🍿#HallaBol | #InsideStory | @JioCinema | @jiotvplus | @redbullindia pic.twitter.com/CTRU7wWZgL
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) July 25, 2020
यात संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या मुलाखतींसह ‘यापूर्वी कधीही न पाहिलेले फुटेज’ समाविष्ट असेल. या माहितीपटात कर्णधार स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, संजू सॅमसन आणि रायन पराग सारख्या स्टारसमवेत संघाचा प्रवास दाखविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वीजेचे बिल पाहून हा क्रिकेटपटू भडकला; म्हणाला, संपूर्ण मोहल्ल्याचे बिल पाठवले की काय…
२०० वर्षांपूर्वी पहिले द्विशतक ठोकणाऱ्या क्रिकेटरने साकारल्यात या भूमिका; ईस्ट इंडिया कंपनीची…
स्टुअर्ट बिन्नीने ‘तो’ मोठा विक्रम मोडल्यानंतर अनिल कुंबळेनी पाठवला होता ‘हा’ खास संदेश
ट्रेंडिंग लेख-
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणरे ३ दिग्गज खेळाडू…
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा