चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल२०२० मध्ये आत्तापर्यंत खास कामगिरी केली नसली तरी या संघाकडून खेळत असलेल्या युवा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनने सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी असे दोन्ही क्षेत्रात चांगले योगदान दिले आहे. त्यामुळे मंगळवारी(१३ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने त्याचे कौतुक केले आहे.
मंगळवारी हैदराबादविरुद्ध चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात करन सलामीला फलंदाजीला आला होता. त्यावेळी त्याने २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना त्याने हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरचे महत्त्वाची विकेटही घेतली.
त्याच्या या शानदार कामगिरीबद्दल कौतुक करताना धोनीने म्हटले आहे की ‘सॅम करन आमच्यासाठी एक परिपूर्ण क्रिकेटपटू आहे. तो एक चांगला सीमींग अष्टपैलू आहे, जो वरच्या फळीतही फलंदाजी करु शकतो, तो चांगले फटके खेळू शकतो आणि तो फिरकीपटूंविरुद्धही चांगली फलंदाजी करु शकतो. तो १५-४५ धावांचे उपयोगी योगदानही देऊ शकतो. संघात डावखुरा चांगला गोलंदाज असणे चांगले आहे, कारण चेंडू फलंदाजाला सोडून बाहेर जाईल की आत येईल हे आपल्याला माहिती नसते.’
सॅम करनने आयपीएलमध्ये चेन्नईकडून आत्तापर्यंत ८ सामने खेळले असून यात त्याने ९९ धावा केल्या आहेत आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या चेन्नई संघ ८ सामन्यांतील ३ विजय आणि ५ पराभवांनंतर सहाव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: सुपर सिक्स! धोनीने नटराजनला मारलेला षटकार ‘या’ कारणामुळे ठरलायं खास
हॉस्पिटलमधून परतलेला गेल कधी करणार मैदानात पुनरागमन? प्रशिक्षकाने दिले उत्तर
फॅन हूँ मैं! चाहत्याने चक्क सगळं घरच केलंय ‘धोनीमय’
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: क्रिकेटचा गंभीर शिलेदार
असे ३ खेळाडू ज्यांना किंग्ज इलेव्हन पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघातून वगळले पाहिजे
दिल्लीला आयपीएल चषक जिंकायचा असेल, तर ‘या’ ३ गोष्टींकडे द्यावे लागले लक्ष