श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिसला रविवारी होरेथुदुवा येथे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या गाडीने एका व्यक्तिला चिरडल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
काही रिपोर्टनुसार रविवारी, 5 जुलै रोजी सकाळी कोलंबो उपनगर पानादुरामध्ये मेंडिसच्या कारने 64 वर्षीय वृद्ध व्यक्तीला धडक दिली. तो व्यक्ती सायकलवर होता. त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू त्याचा मृत्यू झाला.
रविवारीच न्यायाधीशांसमोर मेंडिसला हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या दोघांपैकी कोणीही अल्कोहोल घेतले होते की नाही हे अद्याप कळू शकले नाही.
पोलिस प्रवक्ता एसएसपी जालिया सेनारत्ने यांनी मेंडिसच्या अटकेच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. तसेच मृत व्यक्ती पानादुराच्या गोरकापोला भागातील रहिवासी असल्याचेही समजले आहे.
25 वर्षीय विकेटकीपर फलंदाज मेंडिसने 44 कसोटी आणि 76 वनडे सामन्यांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो कोरोना व्हायरसनंतर सुरु झालेल्या ट्रेनिंगसाठी मेंडिस श्रीलंका संघाचा भाग होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
अशी एक चूक, ‘जी’ बुमराहच्या करियरची लावू शकते वाट
जेव्हा क्रिकेटचा महारथी सचिन मागतो टेनिस किंग रॉजर फेडररकडून बहुमूल्य सल्ला
काहीही झालं तरी ‘या’ व्यक्तीला करायची होती दादाची केकेआरच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी