---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या सुरेश रैनाच्या ‘या’ शानदार विक्रमांना विसरुन चालणार नाही

On: सोमवार, ऑगस्ट 17, 2020 6:58 PM
---Advertisement---

भारताच्या ७४व्या स्वातंत्रदिनी एक नव्हे दोन भारतीय क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. एक म्हणजे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी आणि दूसरा म्हणजे डावखुरा फलंदाज सुरेश रैना. धोनी आणि रैनाने मिळून वनडेत ७३ डावात ३५८५ धावांची भागिदारी केली होती. यात त्यांच्या ९ शतकांचा आणि १८ अर्धशतकांचा समावेश होता. तर, दोघांनी मिळून टी२० क्रिकेटमध्ये २१ डावात २वेळा अर्धशतकी खेळी करत ५४९ धावांची भागिदारी केली होती.

याव्यतिरिक्त मैदानाबाहेरही रैना आणि धोनीची मैत्री खूप घट्ट होती. रैना केवळ ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे तो भारतीय संघात पुनरामन करण्याची प्रतिक्षा करेल आणि अजून काही वर्षे क्रिकेट खेळताना दिसेल, असे सर्वांना वाटत होते. पण, धोनीपाठोपाठ रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याची निवृत्ती जाहीर करत सर्वांना चकित केले.

जुलै २००५मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रैनाने पदार्पण केले होते. त्याने भारतीय संघाकडून अष्टपैलू कामगिरी बजावत १८ कसोटी, २२६ वनडे आणि ७८ टी२० सामने खेळले आहेत. आपल्या १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत रैनाने अनेक मोठ्या खेळी करत काही शानदार विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रैनाच्या त्या शानदार विक्रमांसाठी त्याची नेहमी आठवण काढली जाईल.

सुरेश रैनाचे काही शानदार विक्रम (Suresh Raina Will Be Always Remembered For His Unique Records) –

१. सुरेश रैना हा भारतीय संघाकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. त्याने वनडेतील पहिले शतक २००८ मध्ये हाँगकाँगविरुद्ध आणि कसोटीतील पहिले शतक २०१०मध्ये श्रीलंकाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात लगावले होते. तर, २०१० सालच्या टी२० विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात त्याने टी२० क्रिकेटमधील पहिले शतक केले होते.

२. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील पहिल्या शतकावेळी रैनाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना टी२० क्रिकेटमध्ये शतक करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. एवढेच नाही तर, टी२० विश्वचषकात असा कारनामा करणाराही तो पहिलाच खेळाडू आहे.

३. रैनाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ७ शतके केली आहेत. यात त्याच्या वनडेतील ५, कसोटी आणि टी२० क्रिकेटमधील प्रत्येकी १-१ शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, रैनाने त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्व शतके भारताबाहेरच्या मैदानावर ठोकली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त केवळ शाय होप (११ शतके) आणि क्रिस ब्रॉड (७ शतके) यांनी परदेशातील मैदानावर ७ किंवा त्यापेक्षा जास्त शतके केली आहेत.

४. रैना जगातील टॉप-५ आणि भारतातील पहिला भारतीय फलंदाज आहे, ज्यांनी वनडेत एकही चौकार न मारता ५ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत. २००९मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात एकही चौकार न मारता रैनाने ५ षटकार मारत हा पराक्रम केला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---