मुंबई । भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक विजय दाहियानेही माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या निवृत्ती संदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. दाहियाच्या मते, धोनीला काय करायचे आहे ते त्याला माहित आहे. धोनीबरोबर 30 वर्षे राहिल्यानंतरही त्याच्या मनात काय चालले आहे ते कोणालाही सांगता येणार नाही.
धोनीने अखेर जुलै 2019 मध्ये वनडे विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडकडून पराभूत झाला. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये टी 20 आणि 2011मध्ये वनडे विश्वचषक तसेच 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
स्पोर्ट्सकिडाला बोलताना दाहिया म्हणाला, “धोनीजवळ अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे. माझा विश्वास आहे की कोणी धोनीबरोबर 30 वर्षे राहिला तरी त्या व्यक्तीला धोनी काय विचार करीत आहे किंवा पुढे काय करणार आहे हे माहित नाही. धोनी असाच आहे.”
तो म्हणाला, “भारतीय क्रिकेटवर धोनीचा मोठा प्रभाव आहे. क्रिकेटमध्ये काही सर्वसाधारण खेळाडू असतात तर काही सर्वोत्कृष्ट खेळाडू. तसेच काही महान खेळाडूदेखील असतात, ज्यांनी आपली छाप सोडली आहे. धोनीविषयी बोलायचे झाले तर, तो आपली छाप सोडणार्या खेळाडूंमध्ये अर्थात महान खेळाडूंमध्ये येतो. जर क्रिकेटवर एखादे पुस्तक लिहिले गेले असेल तर त्यात धोनीचा एक अध्याय तर नक्की असेल.”
धोनीने आतापर्यंत 90 कसोटी सामने, 350 वनडे आणि 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. 2015 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाला 3 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे.
अलीकडेच गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड शोमध्ये सांगितले की, “वय हा केवळ आकडा आहे. धोनी जर चांगले फटके मारत असेल, तर तो चांगल्या फॉर्ममध्ये असेल आणि खेळाचा आनंद घेत असेल तर सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी केल्याने देशाला सामना जिंकून देऊ शकतो, तर त्याने खेळायलाच हवे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-माजी खेळाडूने सांगितले मुंबई इंडियन्सच्या यशामागील रहस्य, म्हणतो आर्धी आयपीएल लढाई तर ते…
-‘गौतम गंभीरला अधिक सामन्यांत नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती, तर तो सर्वोत्तम कर्णधार बनला असता’
-दूसऱ्या वनडे सामन्यापुर्वी इंग्लंडला बसला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू झाला मालिकेतून बाहेर
ट्रेंडिंग लेख –
-जिगरी दोस्त असलेले क्रिकेटर झाले एकमेकांचे वैरी, पुढे…
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी