भारतीय संघाचा आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा कर्णधार विराट कोहली याला कोरोना व्हायरसदरम्यान आयोजण्यात आलेल्या आयपीएलच्या गांभीर्याची जाणीव आहे. त्याला वाटते की, त्याच्याप्रमाणे आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी आणि इतर सदस्यांनी टूर्नामेंटच्या जैव सुरक्षित वातावरणाचा सन्मान करावा. Virat Kohli Talks About Bio Bubble
आरसीबीच्या यूट्यूब शो बोल्ड डायरीजमध्ये बोलत असताना विराटने म्हटले की, “कोव्हिड-१९मुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान मला क्रिकेटची कमतरता भासत नव्हती. मी गेल्या १० वर्षांपासून सलग क्रिकेट खेळत आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्ये माझ्याबाबतीत मला एक नवे रहस्य समजले आहे. ते असे की, मला कोणत्याही वेळी क्रिकेटची कमी जाणवत नव्हती.”
युएईमध्ये आयपीएल २०२०च्या तयारीत व्यस्त असलेला विराट म्हणाला की, “बीसीसीआयने जाहीर केलेला एसओपी आणि जैव सुरक्षित वातावरणामुळे लावण्यात आलेले प्रतिबंधाचे सर्वांनी पालन करायला पाहिजे. आपण सगळे इथे क्रिकेट खेळायला आलो आहोत. टूर्नामेंटदरम्यान प्रत्येक वेळी जैव सुरक्षित वातावरणाचा सन्मान करायला पाहिजे. आपण इथे मजा मस्ती करायला आणि इकडे तिकडे फिरायला आणि दुबईची सैर करायला आलो नाहीत.”
“आता आपण मजा मस्ती करण्याजोग्या वातावरणात नाही. आता आपण ज्या परिस्थितीतून जात आहोत, त्याचा स्विकार करा. आपल्याला आयपीएलचा भाग बनण्याचा जो अधिकार मिळाला आहे, त्याला समजून घ्या. सर्वांनी याचा स्विकार पाहिजे. असे वागू नका ज्यामुळे परिस्थिती अजून बिघडेल,” असे पुढे बोलताना विराटने म्हटले.
विराटला आतापर्यंत एकदाही आपल्या नेतृत्त्वाखाली आरसीबी संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देता आली नाही. त्याच्या संघाने तब्बल ३ वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचूनही पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यामुळे यंदा आरसीबीचे सर्व खेळाडू आयपीएल ट्रॉफी जिंकत नवा इतिहास रचण्याच्या तयारीला लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग- अखेर खरे कारणं आले समोर, रैनाचा आयपीएलवर अप्रत्यक्ष निशाणा
आयपीएलमुळे बीसीसीआय अडकलीय संकटात, युएई सरकारपुढे रगडतेय आपले नाक
किती ही संकटे! बीसीसीआयच्या संकटात अजून पडली नवी भर, कुणीही घेईना पुढाकार
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल
असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे
आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा