fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग- अखेर खरे कारणं आले समोर, रैनाचा आयपीएलवर अप्रत्यक्ष निशाणा

September 2, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL


आयपीएल 13 चा हंगाम युएईमध्ये सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठे धक्के बसले. काही दिवसांपूर्वी त्यांचे 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर त्यानंतर लगेचच सीएसकेचा प्रमुख फलंदाज सुरेश रैनाने वैयक्तिक कारणाने आयपीएलच्या या 13 व्या हंगामातून माघात घेतली आहे आणि तो युएईतून भारतात परतला आहे.

त्याच्या माघार घेण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले गेले असले तरी त्यामागे नक्की कोणते स्पष्ट कारण होते याबाबद अनेक अंदाज वर्तवण्यात आले. सीएसकेचे संघमालक एन श्रीनिवासन यांनी केलेल्या धक्कादायक विधानांवरुन रैनाने हॉटेल रुम पसंत न पडल्याने झालेल्या वादामुळे माघार घेतली असल्याचे कयास लावले गेले. तर रैना कोरोनाच्या भीतीने खेळणार नसल्याचेही म्हटले जात आहे.

अशातच आऊटलूकने दिलेल्या वृत्तानुसार रैनाने म्हटले आहे की त्याला कोरोनाच्या या संकटामध्ये कोणतीही जोखीम पत्करायची नाही. तो म्हणाला, ‘जेव्हा जैव-सुरक्षित बबलच सुरक्षित नसेल कोणीही जोखीम कशी पत्करु शकतो? मला एक कुटुंब आहे, ज्यात माझी दोन मुले आणि वृद्ध पालक आहेत. माझ्यासाठी कुटुंबाजवळ परत येणे महत्त्वाचे होते.’

रैना म्हणाला, ‘हा कठिण निर्णय होता. सीएसकेसुद्धा माझे एक कुटुंबासारखेच आहे. पण जेव्हा दुबईत माझ्या मुलांचा चेहरा माझ्या समोर आला आणि परिस्थिती काही चांगली वाटत नव्हती तेव्हा मी परत येण्याचा निर्णय घेतला.’

पण असे असले तरी रैनाने त्याची आयपीएल 2020 मध्ये परतण्याची शक्यता नाकारलीही नाही. तो म्हणाला, ‘मी नेहमीच सीएसकेचा खेळाडू राहिल. जर दुबईमध्ये परिस्थिती सुधारली, तर कदाचीत मी परत जाऊ शकेल. माझ्यासाठी दरवाजे बंद झालेले नाहीत.’

रैनाच्या परत जाण्याबद्दल श्रीनिवासन यांनी नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की ‘रैनाला लवकरच कळेल तो काय गमावत आहे.’

याबद्दल रैना म्हणाला, ‘श्रीनिवासन कदाचित चिडले असावेत. श्रीनिवासन माझ्यासाठी वडिलधारी व्यक्ती आहेत आणि ते नेहमीच माझ्या पाठिशी उभे राहिले आहेत. ते माझ्या हृदयाच्या जवळ आहेत. ते मला त्यांच्या मुलासारखे वागवतात.’

रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १९३ सामन्यात खेळताना ३३.३४ च्या सरासरीने ५३६८ धावा केल्या आहेत.

तसेच सध्या चेन्नईसाठी अनेक मोठ्या धक्क्यांनंतर चांगल्या बातम्या येत आहेत. त्यांचे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले सर्व सदस्यांचा कोरोना अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला आहे. तसेच अन्य सर्व सदस्यांचाही कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता 3 सप्टेंबरला त्यांची दुसरी चाचणी होणार आहे. या चाचणीतही जर सदस्य निगेटिव्ह आढळले तर सीएसकेच्या संघालाही सरावाला सुरुवात करता येईल.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमुळे बीसीसीआय अडकलीय संकटात, युएई सरकारपुढे रगडतेय आपले नाक

किती ही संकटे! बीसीसीआयच्या संकटात अजून पडली नवी भर, कुणीही घेईना पुढाकार

गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी नॉन-स्ट्रायकर क्रिज सोडत असेल तर तो चूकत नाही का?, या दिग्गजाने विचारला प्रश्न

ट्रेंडिंग लेख –

काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा

आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल


Previous Post

आयपीएलमुळे बीसीसीआय अडकलीय संकटात, युएई सरकारपुढे रगडतेय आपले नाक

Next Post

रैनाच्या गैरहजरीत गंभीरचा धोनीला सल्ला, म्हणतोय आता तू…

Related Posts

Photo Courtesy: Facebook/icc
टॉप बातम्या

“इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल”

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

पाकिस्तान संघाचे भारताच्या पावलावर पाऊल; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तब्बल ‘इतक्या’ नवोदित खेळाडूंना संधी

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शार्दुल + तेंडूलकर= शार्दुलकर..! सचिनशी तुलना करत भारतीय दिग्गजाने ठाकूरला दिलं नवं टोपणनाव 

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले…

January 24, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ IPL

रैनाच्या गैरहजरीत गंभीरचा धोनीला सल्ला, म्हणतोय आता तू...

Photo Courtesy: Twitter/IPL

'सुरेश रैनासाठी पैसा महत्त्वाचा नाही', दिग्गजाची सीएसकेच्या संघमालकावर कडाडून टीका

Photo Courtesy: Twitter/RCBTweets

'तुम्ही इथे मजा मस्ती करायला नाही, आयपीएल खेळायला आलाय,' विराट कोहली संतापला

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.