मागील वर्षी जुलै २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीने एकही सामना खेळलेला नाही. यानंतर त्याच्या भविष्याबद्दल अनेक चर्चा होऊ लागल्या.
असं म्हटलं जात आहे की, धोनी (MS Dhoni) येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. परंतु संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, धोनीला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
धोनी बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे आता त्याच्यासमोर आयपीएल हे एक मोठे आव्हान असणार आहे. याच कारणामुळे धोनी चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयोजित केलेल्या कँपमध्ये (सराव सत्र) रोज ३ तास फलंदाजीचा सराव करत होता.
हे पाहून असे दिसत होते की, धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याने २ मार्चपासूनच आपल्या सरावाला सुरुवात केली होती. परंतु आता या कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तसेच चेन्नईनेही १४ मार्चलाच त्यांचे ट्रेनिंग कँप (Training Camp) थांबविले होते.
या दरम्यान पीयूष चावलाने (Piyush Chawla) सांगितले की, धोनी आपल्या फलंदाजी आणि यष्टीरक्षणामध्ये चांगल्या लयीत दिसला होता. तो लक्ष देऊन सराव करत होता. यावेळी त्याने त्याच पद्धतीने फलंदाजी केली, ज्याप्रकारे तो सामन्यांमध्ये करत असतो.
चावलाव्यतिरिक्त कर्ण शर्मानेही (Karn Sharma) सांगितले की, धोनी प्रत्येक दिवशी नेट्सवर २ ते ३ तास फलंदाजी करत होता. ज्याप्रकारे तो चेंडूला फटकारत होता, त्याला पाहून कोणीही म्हणणार नाही की, तो खूप दिवसांनंतर पुनरागमन करत आहे. ज्याप्रकारे तो सराव करत होता, ते आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहित जेव्हाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा त्यांना नडतोच
-३ अशा चुका, ज्यामुळे विश्वचषकात भारताला झालेत मोठे तोटे
-वादामुळे क्रिकेट करियर संपलेले ५ क्रिकेटपटू