भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुलीने आज (२ ऑगस्ट) म्हटले की, महिला आयपीएल किंवा महिला चॅलेंजर स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुरुष खेळाडूंच्या आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबर ते ८ किंवा १० नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, महिला टी२० सामनेही या वेळापत्रकादरम्यान जागा दिली जाईल.
“महिलांची आयपीएल स्पर्धा होण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रीय संघासाठीही आमच्याकडे योजना आहे, याची मी पुष्टी करतो,” असे आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत गांगुली म्हणाला.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर कायम राहण्यासाठी गांगुली कूलिंग ऑफ पिरियड (विश्रांती) बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. गांगुली याबाबत तपशीलवार खुलासा केला नाही. परंतु याबाबत माहिती असणाऱ्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, गेल्या वर्षीप्रमाणे आयपीएलच्या अंतिम टप्प्यात महिला चॅलेंजर्सचे आयोजन होईल.
“महिला चॅलेंजर मालिका १ ते १० नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी तेथे एका शिबिराचे आयोजन केले असेल,” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गांगुली पुढे म्हणाला की, केंद्रीय करारानुसार महिला खेळाडूंसाठी एक शिबिर असेल जे देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे विलंबित झाले आहे.
“आम्ही आमच्या कोणत्याच क्रिकेटपटूला धोक्यात टाकू शकत नाही. मग ते महिला क्रिकेटपटू असो किंवा पुरुष क्रिकेटपटू. हे धोकादायक ठरू शकते,” असेही तो म्हणाला.
“कोविड -१९ मुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीही बंदच राहील. परंतु आमच्याकडे योजना आहे आणि महिलांसाठी एक शिबिर असेल,” असेही तो पुढे म्हणाला.
बीसीसीआयची क्रिकेट ऑपरेशन्स टीम वेळापत्रक तयार करत आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघाला पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये वनडे विश्वचषक खेळण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरूद्ध दोन पूर्ण मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्याची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
-कोरोना व्हायरस असूनही आयपीएल २०२० होणार सुपर-डूपर हिट; जाणून घ्या कारण…
-‘भारताला विश्वचषक जिंकून देऊनच निवृत्त होणार’, पहा कोण म्हणतंय
-रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
ट्रेंडिंग लेख-
-या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल
-कर्टिस कॅम्फर – आयर्लंड क्रिकेटचा भविष्यातील सितारा
-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले






