इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झालेत. त्याचबरोबर खेळाडूही कठोर परिश्रम घेताना दिसतात, तर संघांची सराव सत्रेही जोरदार चालू आहेत. याशिवाय सोशल मीडियावरही खेळाडू आणि संघ खूप सक्रिय असलेले दिसतात.
या हंगामातील पहिला सामना धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि ४ वेळचा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स यांच्यात १९ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. याचदरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवा धोनीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. झिवाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूपच पसंती मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये झिवा तिच्या वडिलांच्या फोटोचे स्केच घेऊन उभी आहे. व्हिडिओमध्ये धोनीची पत्नी साक्षी झिवाला विचारते, हे कोण आहे? त्यावर झिवा म्हणते पप्पा, साक्षी परत तिला विचारते तुला खरंच वाटतंय की हे पप्पा आहेत. त्यावर जीवा म्हणते, हो मला खात्री आहे.
हा व्हिडिओ झिवाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, “पप्पांची सर्वात मोठी चाहती.” या व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
https://www.instagram.com/p/CE6tvC4Hdck/?utm_source=ig_web_copy_link
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. आता चौथ्यांदाही ट्रॉफी जिंकून मुंबई इंडियन्सशी बरोबरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. धोनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबासह रांचीतील फार्महाऊसमध्ये असतानाचे बरेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते.
-आयपीएलमध्ये एका गोलंदाजाला ४ नको ५ षटकांची द्या परवानगी, पहा कुणी केलीय ही मागणी
-दुबईत आयपीएलला गेलेला भारतीय खेळाडू आहे नाराज, म्हणाला…
-धोनी आणि कैफने मिळून फलंदाजला रनआऊट केलेला भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का?
ट्रेंडिंग लेख-
-विराट-डिविलियर्सच्या खांद्याला खांदा लावत हे २ धुरंदर यंदा आरसीबीला बनवणार विजेता
-घरात टीव्ही नसल्याने गल्लीत पान टपरीवर क्रिकेट पाहणारा मुलगा बनला टीम इंडियाचा कर्णधार..
–आयपीएलच्या इतिहासातील ३ सर्वात रोमांचक अंतिम सामने






