आयपीएल 2021 ही एप्रिल महिन्यात सुरु होणारी लोकप्रिय लीग ही यंदा भारतातच होत आहे. मागील हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संयुक्त अरब अमिरातीत आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. आयपीएल जेव्हा सुरु झाली त्याआधीपासूनच या लीगबरोबर अनेक वाद जोडले गेले.
हे वाद कधी मैदानावरील तर कधी मैदानाबाहेरील होते. यामुळे आयपीएल आणि वाद ही गोष्ट चाहत्यांनाही काही नवीन नाही. आत्तापर्यंत जवळजवळ प्रत्येक आयपीएल मोसमात काही ना काही लहान-मोठे वाद समोर आले आहेत.
यातील हे काही निवडक वाद-
1. आयपीएलमध्ये सर्वात मोठा वाद म्हणजे 2013 ला झालेले स्पॉट फिक्सिंग. या वादामुळे संपूर्ण भारतीय क्रिकेटविश्व ढवळले गेले होते. या प्रकरणात अडकलेल्या एस श्रीसंत, अजित चंडेला आणि अंकित चव्हान या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी अटकही केली होती.
तसेच यावेळी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे राज कुंद्रा आणि गुरुनाथ मय्यपन हे मोठे अधिकारी बेटिंगचे प्रकरणात अडकल्याने या दोन्ही संघांवर 2016 आणि 2017 या दोन मोसमांसाठी बंदी घालण्यात आली.
2. आयपीएलच्या पहिल्या मोसमातील श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यातील वाद तर सर्वांच्याच लक्षात असेल. त्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असलेल्या श्रीसंतला भर मैदानातच मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने कानाखाली मारली होती.
3. 2011 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असणाऱ्या शेन वॉर्नने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सामना पराभूत झाल्यानंतर राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय दिक्षित यांना शिवीगाळ केला होता. त्यानंतर वॉर्नच्या विरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला होता.
4. 2012 ला आयपीएलच्या पाचव्या मोसमाचे विजेतेपद मिळवल्यानंतर कोलकता नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरुख खानने वानखेडे स्टेडियमवरील सुरक्षारक्षकाचा अपमान केला होता. या घटनेनंतर शाहरुख खानला वानखेडे स्टेडियमवर येण्यास चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
5. आयपीएल 2018 च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जला त्यांचे चेन्नईतील एमए चिदम्बरम हे घरचे मैदान कावेरी पाणीवाटप विवादामुळे सोडावे लागले होते. चेन्नईने त्यांचा घरचा एकच सामना चेन्नईमध्ये खेळला. या पहिल्या सामन्यात प्रेक्षकांमधून बूट मैदानात भिरकावण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर चेन्नईचे सर्व घरचे सामने पुण्यात झाले.
6. आयपीएलच्या 2016 ला झालेल्या 9 व्या मोसमात पाणी कमतरतेच्या प्रकरणामुळे वाद झाले होते. महाराष्ट्रात त्यावेळी पडलेल्या दुष्काळामुळे मुबंई सुप्रीमकोर्टाने आयपीएलचे मुंबई आणि पुण्याचे मिळून 13 सामने बाहेर हलवण्याचे आदेश दिले होते.
आयपीएल स्पर्धेवरील काही खास लेख
–विशेष लेख: खरंच गेल्या १२ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै
–जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
–आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
–आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
–या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
–आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू






