---Advertisement---

अरर! भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या चिंतेत वाढ, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

On: मंगळवार, मार्च 9, 2021 10:07 PM
---Advertisement---

जूनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर हा सामना होणार आहे. सर्व जगाचे लक्ष या महत्त्वाच्या सामन्यावर लागून आहे. अशातच न्यूझीलंड संघाची चिंता वाढली आहे. न्यूझीलंड संघाचा धडाकेबाज कर्णधार केन विलियम्सन दुखापतग्रस्त झाला आहे.

इतकेच नाही तर त्याच्या दुखापतीने येत्या २० मार्चपासून बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतूनही तो बाहेर पडला आहे. खरं तर विलियम्सनच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. तो उन्हाळ्याच्या दुसऱ्या हाफपासूनच या दुखापतीचा सामना करत आहे.

मेडिकल मॅनेजर डेन शेकेल यांनी पुष्टी करत म्हटले की, ‘विलियम्सन संपूर्ण उन्हाळ्याचा हंगाम या दुखापतीचा सामना करत आहे. परंतु कोणतीच सुधारणा झालेली नाहीये. कारण त्याला विश्रांतीची गरज आहे.’ त्यांनी पुढे बोलताना म्हटलेे की, ‘तो पुढील आठवड्यापासून पुनर्वसन कार्यक्रम सुरू करण्यासाठी उपलब्ध असेल.’

न्यूझीलंडसाठी व्यस्त असणार हे वर्ष

दुसरीकडे न्यूझीलंडचे मुख्य प्रशिंक्षक गॅरी स्टीड यांनी खुलासा केला की, ‘मालिकेतून बाहेर होण्याचा निर्णय घेणे विलियम्सनसाठी कठीण होते. परंतु हे वर्ष संघासाठी खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.’

न्यूझीलंड संघाला आशा आहे की, विलियम्सन लवकरच फिट होईल. कारण जून महिन्यात संघाला इंग्लंडचा दौरा करायचा आहे. तिथे भारतीय संघाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम साामना खेळण्यात येणार आहे.

स्टीड यांनी म्हटले की, ‘विलियम्सनला देशासाठी खेळणे खूप आवडते आणि मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय त्याच्यासाठी सोपा नव्हता. परंतु एका फलंदाजाचा कोपरा सामन्यात खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्याच्या दुखापतीमध्ये सुधारणा न झाल्याने हे स्पष्ट झाले होते की, काहीतरी करण्याची आवश्यकता आहे.’

‘कसोटी चॅम्पियनशीपपूर्वी विलियम्सन पूर्णपणे ठीक होईल, हे आम्हाला निश्चित करायचे आहे,’ असेही स्टीड पुढे बोलताना म्हणाले.

विलियम्सनने आतापर्यंत ८३ कसोटी सामने, १५१ वनडे सामने आणि ६७ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५४.३१ च्या सरासरीने ७११५ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ४७.४८ च्या सरासरीने ६१७३ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त टी२०त त्याने ३१.६६ च्या सरासरीने १८०५ धावा कुटल्या आहेत. त्याने एकूण ३७ आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत.

महत्वाच्या बातम्या:

अनुभवी शिलेदारांची दमदार कामगिरी! दुसर्‍या वनडे सामन्यात भारताचा आफ्रिकेवर सफाईदार विजय

सिक्सर किंग! भारत विरुद्ध इंग्लंडच्या टी२० मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारे हे आहेत पाच खेळाडू

धावांच्या पाठलागात आता पृथ्वीचा डंका! धोनी-कोहली यांना मागे टाकत हा विक्रम केला नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---