भारतात झालेल्या 2011चा विश्वचषक दिग्गज कर्णधार एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता. हा वनडे विश्वचषक भारताने 28 वर्षांनंतर पुन्हा जिंकण्याचा इतिहास घडवला होता. त्यावेळी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने भारताच्या या विजयात मोलाचे योगदान दिले होते.
असा होता 16 खेळाडूंचा संघ
या विश्वचषकासाठी 16 जणांचा भारतीय संघ जाहिर करण्यात आला होता. या संघात एमएस धोनी, विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, आर अश्विन, पीयुष चावला, गौतम गंभीर, हरभजन सिंग, झहीर खान, विराट कोहली, प्रवीण कुमार, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, युसूफ पठाण, सुरेश रैना आणि एस श्रीसंत यांचा समावेश होता.
साल 2013नंतर दिग्गजांनी केले क्रिकेटला अलविदा
साल 2013 नंतर विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, झहीर खान, प्रवीण कुमार, आशिष नेहरा आणि मुनाफ पटेल यांनीही एकेक करत निवृत्ती स्वीकारली. या निवृत्त झालेल्या बऱ्याच खेळाडूंनी आयपीएलमध्ये प्रशिक्षकपद सांभाळणेही पसंत केले आहे.
गंभीर-युवराजही झाले निवृत्त
या 16 जणांपैकी श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या गौतम गंभीरने डिसेंबर 2018 तर युवराज सिंगने 2019मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
काही खेळाडूंना गमवावे लागले संघातील स्थान
या विश्वचषकातील काही खेळाडूंना मात्र खराब कामगिरीमुळे भारतीय वनडे संघातील स्थानही गमवावे लागले होते. भारतीय वनडे संघातील स्थान गमवाव्या लागलेल्या खेळाडूंमध्ये आर अश्विन, पीयुष चावला, हरभजन सिंग, युसूफ पठाण आणि सुरेश रैना यांचा यांचा समावेश होता. तसेच श्रीसंतवर 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती. ही बंदी संपल्यानंतर त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर फार उशीर झाला. त्यामुळे त्यानेही निवृत्ती घेतली. तसेच हरभजन सिंगनेही निवृत्ती घेतली.
धोनी-रैना एकाच दिवशी निवृत्त
एमएस धोनी व सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले तर 27 फेब्रुवारी 2021 रोजी युसूफ पठाणने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
काही खेळाडूंना आजही संघात स्थान मिळण्याची अपेक्षा
तेव्हा विश्वचषकात निवड झालेल्या 16 खेळाडूंपैकी आर अश्विन, पीयुष चावला, विराट कोहली यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नाही. परंतु यातील पीयुष चावला भारतीय संघाचे दरवाजे जवळपास बंद झाल्यात जमा आहेत.
केवळ दोन खेळाडू आहेत संघाचा भाग
या विश्वचषकात खेळलेल्या खेळाडूंपैकी विराट कोहली हा क्रिकेटच्या तिनही प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतो, तर आर अश्विनला कसोटी संघातील नियमित सदस्य आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मार्करमऐवजी भुवीने उधळला टॉस, राजस्थान करणार पहिली बॅटिंग; महत्त्वाचा खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून