25 वर्षांपूर्वी 22 एप्रिल 1998 ला संयुक्त अरब अमीरातीमधील शारजाच्या मैदानावर भारताचा तेव्हाचा उभारता सितारा खेळत होता जो पुढे जाऊन या खेळाचा देवता बनला. त्याचे नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील चौदावे शतक होते. पण हे शतक त्याच्या अनेक महत्त्वाच्या खेळींपैकी एक आहे.
टोनी ग्रेगने सामन्याचे समालोचन करताना सचिनच्या अविस्मरणीय खेळीचे विश्लेषण करत “काय विस्मयकारक खेळाडू “, असे उद्गारही काढले होते. कोका कोला कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारतापुढे त्या काळचा बलाढ्य संघ आणि त्या स्पर्धेतील एकही सामना न हरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हान होते. 22 एप्रिल 1998 ला भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध शारजाच्या ऐतिहासिक मैदानावर होणार होता. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना एका सराव सामन्यासारखा होता कारण त्यांचा संघ आधीच अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. पण भारतासाठी अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा होता.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदजी करताना मायकल बेव्हनच्या 101 धावांच्या जोरावर 284 धावांचा डोंगर भारतासमोर रचला होता. सचिन तेंडुलकरने त्या सामन्यात गोलंदाजी करताना 5 षटकात 25 धाव देत एक गडी बाद केला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली हे भारताचे तेव्हाचे सलामीची फलंदाज धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरण्याच्या आधीच मैदानात वाळूचे वादळ आले आणि सामना काही काळ स्थगित करावा लागला होता.
त्यामुळे जेव्हा भारत पुन्हा धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा भारताला 46 षटकात 276 धावा करायच्या होत्या पण भारतासाठी खरे लक्ष्य होते ते ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर निदान 236 धावा करुन न्यूझीलंडपेक्षा चांगला नेटरनरेट ठेऊन अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित करणे.
#OnThisDay 1998. @sachin_rt and @ShaneWarne go to war, with Sachin hitting 143 from 131 in a Sharjah ODI! pic.twitter.com/DkrOYFSm0r
— ICC (@ICC) April 22, 2016
या सामन्यात सचिनने तेव्हा आपला उत्तोमोत्तम खेळ केला आणि भारताला अंतिम सामन्यात जाण्यास पात्र ठरवले. विशेष म्हणजे या सामन्यात सचिन जेव्हा बाद झाला तेव्हा पंचानी त्याला बाद दिले नव्हते तरी सचिन खेळाडूवृत्ती दाखवून पॅविलनमध्ये परतला होता. कदाचित यामुळेच भारताला हा सामना जिंकता आला नाही पण सचिनने जगाला आपल्या बॅटची जादू दाखून दिली होती. त्याकाळचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला शेन वॉर्नविरुद्धही सचिनने आक्रमक पवित्रा स्विकारला होता.
सचिनने त्या सामन्यात 197 मिनिटे फलंदाजी करत 131 चेंडूत 143 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. यासामन्यात सामनावीराचा मानही त्यालाच मिळाला होता. त्या सामन्यात भारताला 46 षटकात 5 बाद 250 धावाच करता आल्याने भारताला हा सामना 26 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. परंतू भारताने 236 धावांचा टप्पा पार केल्याने अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले होते.
#OnThisDay in 1998, @sachin_rt played one of the greatest ODI innings in history, smashing 143 off 131 balls v Australia in Sharjah to seal India's place in the Coca-Cola Cup final. pic.twitter.com/afIicI0zV8
— ICC (@ICC) April 22, 2019
त्यानंतर सचिनने वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिल 1998 ला झालेल्या अंतिम सामन्यात 134 धावांची खेळी करत भारताचे नाव कोका कोला कपवर कोरले आणि मालिकावीराचा किताबही स्वतःच्या नावे केला. सचिनच्या त्या शारजावरील शतकांना 22 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप शतके केली पण ही दोन शतके नेहमीच प्रत्येक भारतीयांच्या मनात एक अविस्मरणीय आठवण म्हणून राहिली आहेत.