भारतीय संघासाठी २०२१ वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली होती. कारण, याचवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्यांदा कसोटी मालिका आपल्या नावावर केली. परंतु, त्यानंतर भारतीय संघाचा वाईट काळ सुरू झाला. कारण याच वर्षी भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत देखील भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली.
तसेच यावर्षी भारतीय संघासाठी एकूण २५ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली. या २५ खेळाडूंमध्ये एक असा गोलंदाज आहे, ज्याने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कसोटीत ५ खेळाडूंचे पदार्पण
यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये ५ खेळाडूंना भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुदंर, नवदीप सैनी, टी नटराजन आणि अक्षर पटेलचा (Axar Patel) समावेश आहे. अक्षर पटेलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ५ कसोटी सामन्यातील १० डावात ३६ गडी बाद केले. तो यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर ५२ गडी बाद करत आर अश्विन सर्वोच्च स्थानी आहे.
तसेच श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) नुकताच संपन्न झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली होती. या मालिकेत त्याने २ कसोटी सामन्यांच्या ४ डावात ५९ च्या सरासरीने २०२ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश होता. तर वॉशिंग्टन सुदंरने ४ कसोटी सामन्यात २५६ धावा केल्या. तर नवदीपने ४ आणि नटराजनने ३ गडी बाद केले.(Indian players who made their international debut in 2021)
वनडे क्रिकेटमध्ये ९ खेळाडूंचे पदार्पण
तसेच वनडे क्रिकेटमध्ये ९ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये इशान(Isham kishan) किशन, कृणाल पंड्या, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, नितीश राणा, कृष्णप्पा गौतम, चेतन साकारिया आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.
यादरम्यान कृणाल पंड्याने सर्वाधिक ४ डावात १३० धावा केल्या. यादरम्यान त्याने एक अर्धशतक देखील झळकावले. तर सूर्यकुमार यादवने १२४ धावा केल्या. तर इतर कुठल्या खेळाडूला १०० धावा देखील करता आल्या नाही. गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ६ गडी बाद केले.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी केले पदार्पण
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी एकूण ११ खेळाडूंनी पदार्पण केले. ज्यामध्ये इशान किशन, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, पृथ्वी शॉ, हर्षल पटेल, चेतन सकारिया, संदीप वॉरियर, वरुण चक्रवर्ती आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांचा समावेश आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवने सर्वाधिक २४४ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :
वेस्ट इंडिज क्रिकेटने घेतला मोठा निर्णय, निवड समीतीत होणार ‘हे’ फेरबदल