आयपीएल 2024 च्या आणखी एका सामन्यात गोलंदाजाची भरपूर धुलाई झाली. यावेळी पाळी होती मुंबई इंडियन्सची. शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सविरुद्ध 257 धावांचा प्रचंड मोठा स्कोर उभा केला. मात्र असं असूनही दिल्लीला सामना जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. कारण मुंबईच्या फलंदाजांनी देखील अरुण जेटली स्टेडियमच्या या खेळपट्टीवर तुफान फटकेबाजी केली. अखेर दिल्ली कॅपिटल्स हा सामना अवघ्या 10 धावांनी जिंकली. या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत यानं ‘इम्पॅक्ट खेळाडू’ नियमाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
रिषभ पंत यानं आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट खेळाडू’ नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या नियमाविरोधात बोलणारा तो काही पहिला भारतीय खेळाडू नाही. या आधी रोहित शर्मा, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल देखील या नियमाविरोधात बोलले आहेत.
मुंबईविरुद्ध 10 धावांनी विजय मिळवल्यानंतर रिषभ पंत म्हणाला, “आम्ही 250 हून अधिक धावा केल्यामुळे संतुष्ट होतो. परंतु ‘इम्पॅक्ट खेळाडू’ नियमामुळे या धावसंख्येचा बचाव करणं देखील कठीण होत आहे.” तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या सामन्यात असे बरेच प्रसंग आले, जेव्हा वाटत होतं की मुंबई इंडियन्स या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करेल. शेवटी सलग विकेट पडल्यामुळे हार्दिक पांड्याच्या संघाला पराभव पत्कारावा लागला.
या विजयानंतर रिषभ पंतनं संघाचा युवा सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्क याचं चांगलच कौतुक केलं आहे. मॅकगर्कनं या सामन्यात अवघ्या 27 चेंडूत तुफानी 84 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीनं दिल्लीसाठी मोठ्या धावसंखेचा पाया रचला गेला. पंत म्हणाला,”तो पहिल्या दिवसापासूनचं आश्चर्यजनक कामगिरी करत आहे. तुम्ही एका युवा खेळाडूकडून अशीच अपेक्षा करता. तो प्रत्येक सामन्यानंतर चांगला होत जातोय.”
या पराभवानंतर मुंबईची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. संघाचे 9 सामन्यांत 1 विजय आणि 6 पराभवानंतर 6 गुण असून ते गुणतालिकेत नवव्या स्थानी आहेत. दिल्लीनं 10 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला असून, ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आधीच पराभव, त्यात दंडाची कारवाई, मुंबईच्या कोणत्या खेळाडूला बसलाय फटका? वाचा संपूर्ण प्रकरण
दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय, घरच्या मैदानावर दिला मुंबई इंडियन्सला धोबीपछाड
मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर? टॉप-4 मध्ये येण्यासाठी आता काय करावं लागेल? जाणून घ्या