नवी दिल्ली| क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम होतात आणि तुटतातही. अशी अनेक विक्रम नोंदली गेली आहेत, ज्यावर चाहत्यांना सहज विश्वास बसणार नाही . तुम्हाला माहित आहे का की, क्रिकेट इतिहासात एक सामना होता ज्यामध्ये एका संघाने एका चेंडूवर 286 धावा केल्या होत्या. हा सामना सन 1884 मध्ये खेळला गेला होता ज्यामध्ये दोन खेळाडूंनी केवळ धावून एका चेंडूत 286 धावा केल्या होत्या. एवढेच नव्हे तर एका चेंडूनंतर त्यांनी आपला डाव घोषित केला आणि सामना जिंकला होता.
चेंडू अडकला होता झाडावर
तब्बल 127 वर्षांपूर्वी म्हणजेच 15 जानेवारी 1894 रोजी ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच इलेव्हन यांच्यात सामना खेळला गेला होता. हा सामना बॉनबरीच्या मैदानावर झाला होता. सामन्यादरम्यान, फलंदाजाने लांब फटका मारला आणि चेंडू दूर गेला आणि सीमेरेषेजवळ असलेल्या झाडावर अडकला. त्यावेळी फलंदाजांनी पळून 286 धावा केल्या होत्या. हा रेकॉर्ड कॅमेऱ्यात कैद होऊ शकला नाही. पण या घटनेचा एकमेव पुरावा सापडतो ते त्यावेळचे इंग्रजी वृत्तपत्र पॉल मॉल गॅझेटमध्ये. या वृत्तपत्रात या सामन्याचे वृत्त छापले असल्याचे म्हटले जाते.
एका चेंडूवर 21 धावांचा विक्रम
तथापि, एका चेंडूवर सर्वाधिक 21 धावा काढण्याच्या विक्रमाची अधिकृत नोंद ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. 12 मार्च 2006 रोजी झालेल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला एक गडी राखून पराभूत केले होते. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 434 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने एक गडी राखून 438 धावा केल्या होत्या.
असा झाला होता विक्रम
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 48 व्या षटकातिल पहिल्या चेंडूवर 21 धावा फटकावल्या गेल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रॉजर टेलिमुचसने सलग चार नो-बॉल फेकले होते. या चार चेंडूवर 4, 1, 4, 6 धावा फाटकावल्या होत्या. त्यानंतर फेकलेला चेंडू नो बॉल नव्हता आणि त्या चेंडूवर 2 धावा काढल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध जे कोणत्याच संघाला करता आले नाही ते मुंबई इंडियन्सने करुन दाखवले
मुंबईविरुद्ध ५० धावा करताच चेन्नईने बेंगलोरला केले ट्रोल, जाणून घ्या कारण
“मी बरा होण्याच्या मार्गावर, चाहत्यांना धन्यवाद”, शस्त्रक्रियेनंतर कपिल देव यांचा संदेश
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला