fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ना रोहित, ना गेल ‘या’ ३ क्रिकेटपटूंनी ठोकले आहे क्रिकेटमधील सर्वात लांब षटकार

3 Batsman smashed longest six in Cricket

आतापर्यंत क्रिकेट सुरु होऊन १४३ वर्षे लोटली आहेत. सर्वप्रथम सुरु झाले, ते कसोटी क्रिकेट. जो आजपर्यंतचा सर्वात मोठा क्रिकेट प्रकार आहे. हा क्रिकेटचा प्रकार पाहणारा चाहतावर्गही वेगळाच आहे. खरंतर कसोटी क्रिकेटला सर्वात कठीण आणि मजेशीर क्रिकेट प्रकार म्हटले जाते. कारण फलंदाजांबरोबरच गोलंदाजाचीही यामध्ये कसोटी लागलेली असते. त्यातूनच कळते की कोणता फलंदाज किंवा गोलंदाज किती पाण्यात आहे. असे असले तरीही काळानुसार क्रिकेट प्रकारात आणि फलंदाजांच्या शैलीत बदल झालेले पहायला मिळाले आहेत. पुढे जाऊन वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट प्रकाराची देण या क्रिकेटला लाभली आहे. यामध्ये फलंदाजांनीही आपल्या खेळीत आवश्यक बदल करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांचे लांब शॉट्स पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुरलेले असतात.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तंत्रशुद्ध फटक्यांव्यतिरिक्त हवेतील फटक्यांनाही एक वेगळेच महत्त्व असते. लांब षटकार नेहमीच सर्वाधिक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. ख्रिस गेल, रोहित शर्मा, कॉलिन मुनरो या सर्व खेळाडूंना सध्याच्या काळात षटकार किंग म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीबद्दल बोलायचं झालं, तर गेल अव्वल क्रमांकावर आहे, शाहिद आफ्रिदी दुसऱ्या आणि रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने तब्बल ५३४ षटकार ठोकले आहेत. आफ्रिदीने ४७६ आणि रोहितने ४२३ षटकार ठोकले आहेत. यांतील काही  दिग्गज खेळाडूंनी तर अशी फटकेबाजी केली आहे, की चेंडू थेट मैदानाच्या बाहेर गेला आहे.

या लेखात आपण त्या फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकला आहे. परंतु त्या खेळाडूंची नावे घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण त्यामध्ये गेल किंवा रोहितचा समावेश नाही.

षटकारांच्या अंतरावरुन क्रिकेटमध्ये अनेक वाद आहेत. कारण बऱ्याच वेळा ते अंतर योग्यरितीने मोजता येत नाही. असे असले तरी या लेखात असे काही षटकार दिलेले आहे, जे सर्वाधिक लांब षटकार मानले जातात.

क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार ठोकणारे ३ धमाकेदार फलंदाज- 3 Batsman smashed longest six in Cricket

३. मार्टिन गप्टील

न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टीलला (Martin Guptill) तुफान फलंदाजी करणारा फलंदाज म्हटले जाते. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर त्याने गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले आहे आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचाही कारनामा केला आहे. गप्टीलने २०१२ साली वेलिंग्टन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सामन्यात खेळताना तब्बल १२७ मीटर लांब षटकार ठोकला होता. त्यामुळे त्याने मारलेला हा षटकार क्रिकेटमधील तिसरा सर्वात लांब षटकार म्हटले जाते.

२. एडेन ब्लिझार्ड

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज एडेन ब्लिझार्डला (Aiden Blizzard) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याने पुरती धमाल केली आहे. २००८मध्ये व्हिक्टोरिया संघाकडून खेळताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० सामन्यात त्याने १३० मीटर लांब षटकार ठोकला होता. तो एका टी२० स्पर्धेतील अंतिम सामना होता. त्याने ठोकलेला हा षटकार क्रिकेटमधील दुसरा सर्वात लांब षटकार आहे.

१. ब्रेट ली

ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट ली (Brett Lee) या खेळाडूची गणना घातक गोलंदाजांमध्ये होते. परंतु तो फलंदाजीतही तितकाच मजबूत आहे. त्याने २००५ मध्ये गाबा येथे एका कसोटी सामन्यादरम्यान सर्वात लांब षटकार मारला होता. त्यावेळी डॅरेन पॉवेल हा गोलंदाजी करत होता. तो षटकार इतका जबरदस्त होता, की चेंडू थेट पार्किंगमध्ये जाऊन पडला होता. तो षटकार १३० ते १३५ मीटर लांब असल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे त्याने क्रिकेट इतिहासातील सर्वात लांब षटकार ठोकून तो सर्वात लांब षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला.

वाचनीय लेख-

-असे ‘बाप- लेक’ क्रिकेटर, ज्यांनी एकाच सामन्यात खेळताना केली ‘बाप’ कामगिरी

-फॉर्म आणि फिटनेसमुळे लवकरच निवृत्ती घेऊ शकणारे ४ भारतीय क्रिकेटर

-एबीचा ३१ चेंडूत शतक करण्याचा सहज मोडू शकणारे ५ धडाकेबाज फलंदाज

You might also like