---Advertisement---

‘या’ तीन भारतीयांना आता कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अवघड, एक तर आहे ‘त्रिशतकवीर’

On: गुरूवार, जानेवारी 14, 2021 6:07 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने पडले आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे ही मालिका सध्या बरोबरीत आहे. सध्या भारतीय संघात बरेच चांगले खेळाडू उपस्थित आहेत. त्याचबरोबर काही चांगले खेळाडू सुद्धा संघातून बाहेर आहे. त्यामुळे भारतीय संघात आपले स्थान मिळवणे आणि ते पक्के करणे ही खूप अवघड गोष्ट असते.

कारण प्रत्येक वर्षी भारतीय संघात नवीन खेळाडू पदार्पण करतात काही स्थिर होतात तर काही अल्पावधीत संघातून बाहेर होतात. भारतीय संघातून बाहेर पडलेल्या खेळाडूला पुन्हा संघात स्थान मिळवणे खूप अवघड असते. कारण त्यावेळी तुमचे स्पर्धक वाढलेले असतात. त्यामुळे असे काही खेळाडू आहेत, जे एकदा संघातून बाहेर पडले आणि त्यांना पुन्हा संघात स्थान मिळविता आले नाही.

त्यामुळे आज आम्ही या लेखामधून अशा तीन खेळाडूंबद्द्ल माहिती देणार आहोत, जे कदाचित पुन्हा भारतीय कसोटी संघात पुनरागमन करू शकणार नाहीत.

1. मुरली विजय

भारतीय संघाचा प्रमुख सलामी फलंदाज मुरली विजय, जो एकेकाळी कसोटीत भारतीय डावाची सुरुवात करत होता. मात्र मागील काही काळापासून तो भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. त्याला पुनरागमन करत आलेले नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करणे खूप अवघड काम असते. मुरली विजय 2017 नंतर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 18.80 च्या सरासरीने फलंदाजी केली होती. अशा खराब कामगिरीमुळे त्याला भारतीय संघातून बाहेर पडावे लागले. तेव्हापासून मुरली विजयला आतापर्यंत भारतीय कसोटी संघात पुनरागमन करता आले नाही. सध्या भारतीय संघातील युवा सलामी फलंदाज चांगली कामगिरी करत असल्याने मुरली विजयला संघात स्थान मिळविता येईना. त्यामुळे त्याला पुनरागमन करणे अवघड जात आहे.

2. शिखर धवन

भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने इंग्लंड दौर्‍यावर खराब कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला भारतीय निवड समितीने बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर त्याने 2018 साली आशिया चषकमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे शिखर धवनला मालिकावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. मात्र भारतीय निवड समितीला कसोटी क्रिकेटमध्ये शिखर धवनवर विश्वास नाही.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे आणि टी-20 संघात त्याला स्थान दिले होते. मात्र त्याची कसोटी संघात निवड केली नाही. आता शिखर धवन भारतीय कसोटी संघात पुन्हा दिसण्याची शक्यता धूसर आहे.

3. करुण नायर

करुण नायर भारतीय संघाचा उत्कृष्ट फलंदाज होता. मधल्या फळीतील तो एक चांगला नामवंत खेळाडू होता. तो भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना ज्या खेळाडूंनी त्रिशतक ठोकले आहे त्यापैकी एक आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या पर्दापनाच्या सामन्यात त्याने त्रिशतक ठोकले होते. त्यानंतर त्यांच्या नावाची खूप चर्चा झाली होती. त्यामुळे तो भविष्यात एक महान खेळाडू होणार असे अंदाज बांधले जात होते.

परंतु करुण नायरला पुढील सामन्यात आपल्या खेळीत सातत्य राखता आले नाही. तो सपशेल अपयशी ठरत गेला. त्यामुळे तो भारतीय संघातून बाहेर फेकला गेला. भारतीय संघातील सध्या मधल्या फळीतील खेळाडूंची कामगिरी पाहता करुण नायरला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

महत्वाच्या बातम्या:

गावसकर यांच्या मताने आम्हाला तसूभरही फरक पडत नाही, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे विधान

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहला सगळे सामने खेळवण्याची गरज नाही

न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा, दुखापतीमुळे उपकर्णधार मालिकेला मुकणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---