---Advertisement---

द वॉल.! कसोटीमधील ‘हे’ तीन रेकॉर्ड राहुल द्रविडची शान अधिक वाढवतात

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 9:30 PM
---Advertisement---

राहुल द्रविडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ या नावाने संबोधले जाते. राहुल द्रविड हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी क्रिकेटर मानला जातो. राहुल द्रविडने वनडे क्रिकेटमध्येही जबरदस्त प्रदर्शन केले आहे. कसोटी आणि वनडे दोन्ही प्रकारात त्याने दहा हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमधील बचावात्मक कौशल्य राहुल द्रविडच्या फलंदाजीमध्ये होते आणि तो खूप संयमाने खेळ करायचा. भारतीय संघामध्ये तिसऱ्या क्रमांकावर तो फलंदाजी करायचा. राहुल द्रविडने आपल्या काळात प्रत्येक गोलंदाजांचा सामना केला आहे. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. या लेखात, त्याच्या तीन अनोख्या विक्रमाची नोंद घेतली आहे.

राहुल द्रविडचे तीन अनोखे विक्रम

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळलेला खेळाडू

‘द वॉल’ राहुल द्रविडच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १६४ सामन्यातील २८६ डावात १३२८८ धावा करणारा राहुल द्रविडला कारकीर्दीत ३१२५८ चेंडूंचा सामना करावा लागला. इतर कोणत्याही फलंदाजाने इतके चेंडू खेळलेले नाहीत.

कसोटी क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर सर्वाधिक धावा

राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमधील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वोत्तम फलंदाज होता. त्याच्यासारख्या इतर कुठल्याही फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर एवढ्या धावा केल्या नाहीत. राहुल द्रविडने तिसर्‍या क्रमांकावर खेळत कसोटी क्रिकेटमध्ये १०५२४ धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी

राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये २० शतकी भागीदारी केल्या आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड एकत्र मिळून ६९२० धावा केल्या. अद्याप या दोघांचा हा विक्रम कोणीही मोडला नाही. बर्‍याच वेळेस राहुल-सचिन जोडीने एकत्र खेळून भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा राहुल द्रविडचा टी२०त पाहायला मिळाला होता ‘रुद्रावतार’, मारले होते सलग ३ गगनचुंबी षटकार

फलंदाज म्हणून हिट; तर प्रशिक्षक म्हणून सुपरहिट, राहुल द्रविडच्या शिष्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिराज्य!

अजिंक्य रहाणेला १२ वर्षांपूर्वी ‘द वॉल’ राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ लाखमोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---