आयपीएलमध्ये स्पर्धेत चौकार-षटकारांची आतिषबाजी नेहमीच पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही काही सामन्यांमध्ये फलंदाज वर्चस्व गाजवताना दिसले आहेत. त्यातच यावर्षीचा आयपीएल हंगाम यूएईमध्ये होत असल्याने तेथील मैदानांच्या लहान सीमेमुळे या आयपीएलमध्ये फलंदाज गोलंदाजांवर वरचढ होताना दिसले आहेत.
अशा परिस्थितीत गोलंदाजांना अत्यंत हुशारीने गोलंदाजी करावी लागते. गोलंदाजांच्या अगदी थोड्याशा चुकीचा फलंदाज पूर्ण फायदा घेतात. त्यातही पॉवर प्लेमधील क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधामुळे गोलंदाजांना अधिक अडचणी येतात. पॉवर प्लेमध्ये केवळ दोन क्षेत्ररक्षक ३० यार्ड वर्तुळाबाहेर असतात, त्यामुळे फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा घेतात आणि गोलंदाजीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात.
आयपीएलच्या या हंगामात, असे बरेच गोलंदाज आहेत ज्यांनी पॉवरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी केली आणि आपल्या अचूक गोलंदाजीमुळे फलंदाजांना त्रास दिला. पण त्याचवेळी काही गोलंदाज असे होते ज्यांना फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये लक्ष्य केले आणि त्यांच्या षटकांत अधिक धावा जमविल्या. या लेखाच्या माध्यमातून आम्ही अशा ३ गोलंदाजांबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी या मोसमात पॉवरप्लेमधील त्यांच्या एका षटकात सर्वाधिक धावा दिल्या.
३. ट्रेंट बोल्ट – २० धावा
पॉवरप्लेच्या एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट तिसर्या क्रमांकावर आहे. १८ ऑक्टोबरला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात बोल्टने मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांच्यासमोर २० धावा खर्च केल्या. बोल्टच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मयंकने राहुलला एक धावा घेऊन स्ट्राईक दिला. यानंतर बोल्टच्या या षटकात राहुलने एकट्याने ३ चौकार आणि एक षटकार ठोकला. या षटकात बोल्टने एकूण २० धावा दिल्या, त्यामध्ये एक आवांतर चेंडूही (वाइड) होता.
२. खलील अहमद – २१ धावा
पॉवरप्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादचा खलील अहमदने एका षटकात सर्वाधिक २१ धावा देत दुसरे स्थान मिळवले आहे. खलीलने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या एका षटकात २१ धावा दिल्या होत्या. सॅम करनच्या तुफानी फलंदाजीपुढे खलील अडचणींचा सामना करताना दिसला. खलीलच्या षटकात करनने एकट्याने २१ धावा केल्या. खलीलच्या या षटकात करनने २ चौकार आणि २ षटकार आणि एक धाव घेतली.
१. तुषार देशपांडे – २६ धावा
युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने दिल्ली कॅपिटलचा गोलंदाज तुषार देशपांडे याच्या पॉवरप्लेमधील एका षटकात सर्वाधिक २६ धावा केल्या आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध पॉवरप्ले दरम्यान पाचव्या षटकात तुषार गोलंदाजी करायला आला होता. त्या षटकात ख्रिस गेलने पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन चौकार ठोकले आणि नंतर तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर गेलने पुढील तीन चेंडूंत एक चौकार, एक षटकार आणि एक धाव घेतली. देशपांडेनेही या षटकात एक वाइड चेंडू टाकला होता आणि त्यामुळे त्याने एकूण २६ धावा दिल्या.
महत्वाच्या बातम्या –
-मोहम्मद सिराजने केला कोलकाताच्या फलंदाजांचा चुराडा; नोंदवला मोठा विक्रम
-व्हिसा मिळूनही झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत संघासोबत गेले नाही पाकिस्तानला, जाणून घ्या कारण
-शतक ठोकले पण इतिहास रचलाय हे माहिती नव्हतं, सामन्यानंतर धवनचे अचंबित करणारं वक्तव्य
ट्रेंडिंग लेख –
-सीएसकेला दूसऱ्या ड्वेन ब्रावोचा शोध, ‘ही’ ३ नावं आहेत चर्चेत
-क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
-सचिन तंबूत परतलेला असताना अझर, सिद्धूने केलेली ती खेळी वर्षानुवर्षे लक्षात ठेवली गेली