आयपीएलच्या पहिल्या हंगामाची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. तेव्हा या स्पर्धेला इतके पसंत केले जाईल, याबद्दल कोणालाही अंदाज नव्हता. आजच्या काळामध्ये प्रत्येक देशाचे खेळाडू याचा भाग बनू इच्छित आहेत आणि त्यांचे बोर्ड या टूर्नामेंटसाठी आपले खेळाडू उपलब्ध करून देतात. तथापि आयपीएलची जेव्हा सुरुवात झाली होती, तेव्हा या लीगमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंचा इतका सहभाग पाहायला मिळाला नव्हता, जितका आता पाहायला मिळतो. याच्या मुख्य कारणांपैकी एक कारण हे देखील आहे की त्यांच्या काउंटी हंगामाची सुरवात आयपीएल हंगामाच्या दरम्यानच होते. याशिवाय इंग्लंड त्यावेळी आंतरराष्ट्रीय सामनेदेखील खेळायचा.
त्यावेळी इंग्लंडचे एक-दोन खेळाडू सोडून ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज आणि आशिया खंडातील देशांचे खेळाडू खेळताना पाहायला मिळत होते. तथापि काळानुसार इंग्लंड क्रिकेट बोर्डने देखील आपल्या खेळाडूंना या टूर्नामेंटमध्ये खेळण्याची परवानगी दिली आणि आता इंग्लंडचे अनेक प्रमुख खेळाडू या लीगमध्ये खेळताना पाहायला मिळतात.
आगामी आयपीएल हंगामामध्ये इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार मॉर्गनसोबत इतर अनेक खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. आज आपण या लेखामध्ये इंग्लंडच्या त्या ३ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल की त्यांनी आयपीएलमध्ये सामने खेळले आहेत.
३. ओवेस शाह:
ओवेस शाह उजव्या हाताचा मध्यक्रमातील फलंदाज होता ज्याची कारकिर्द आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगले होती. त्याने तिन्ही प्रकारामध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आणि तो आयपीएलमध्ये देखील खेळला आहे. शाह आपल्या आयपीएल कारकिर्दी दरम्यान तीन संघांसोबत खेळला आहे. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि कोची टस्कर्स केरळ या टीम्सचा समावेश आहे. तो २०१० मध्ये केकेआर टीमचा भाग होता, जिथे त्याने फक्त ५ सामने खेळले, पण त्याची सरासरी ५७.५ होती.
यानंतर २०११ मध्ये तो कोची टस्कर्स केरळमध्ये दाखल झाला, जिथे त्याने फक्त ३ सामने खेळले आणि नंतर पुढच्या दोन हंगामामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने त्याला आपल्या ताफ्यामध्ये सामील करून घेतले. त्याने राजस्थानसाठी १५ सामन्यांमध्ये ३३.१८ च्या सरासरीने ३६५ धावा बनवल्या.
२. ग्रॅहम नेपियर:
ग्रॅहम नेपियर एक अष्टपैलू खेळाडू होता जो एसेक्ससाठी खेळत होता. त्याने कधी इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही पण त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली ते देखील सचिन तेंडूलकरसोबत मुंबई इंडियन्समध्ये. नेपियरची खास बाब ही होती की तो सतत १४० पेक्षा अधिक गतीने गोलंदाजी करू शकत होता आणि त्यानंतर स्लोअर बॉल टाकण्याची कला देखील त्याच्यामध्ये होती.
साल २००८ मध्ये त्याने एका सामन्यात ५८ चेंडूमध्ये १५२ धावांची नाबाद खेळी केली होती आणि यामुळे त्याला मुंबई इंडियन्सने आपल्यासोबत जोडले होते. पूर्ण हंगामामध्ये त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने १५ धावा केल्या आणि आपल्या चार षटकांमध्ये एक विकेट घेतली होती. यानंतर त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.
१. रवि बोपारा:
रवि बोपारा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो आयपीएलमध्ये किंग्स इलेवन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद संघांकडून खेळला आहे. साल २००९ मध्ये तो किंग्स इलेवन पंजाबसाठी खेळला. जिथे त्याने एकूण १५ सामने खेळले. साल २०१५ मध्ये त्याला सनरायझर्स हैदराबादने आपल्या संघामध्ये सामील केले. जिथे त्याला ९ सामने खेळण्याची संधी मिळाली पण तो काही खास करू शकला नाही. यानंतर बोपाराला पुन्हा आयपीएल खेळण्याची संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० मालिकेदरम्यान संघातून वगळल्यानंतर कसे वाटले? शिखर धवनने दिले ‘हे’ उत्तर
“तो गोलंदाजांची क्षमता जाणतो”, सीएसकेच्या ‘या’ अष्टपैलूने केले धोनीचे कौतुक






