जेव्हा एखादा संघ ऑस्ट्रेलियन भूमीवर क्रिकेट खेळायला जातो, तेव्हा प्रतिस्पर्धी असलेल्या संघाचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सामोरे जाताना जास्त यशस्वी होत नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीची स्वरुप इतर देशांच्या तुलनेत वेगळे असते. त्यामुळे इतर देशाच्या फलंदाजांना स्थिर होण्यासाठी जास्त चेंडूचा सामना करावा लागतो. परंतु, अनेक फलंदाज सुरुवातीच्या चेंडूवर बाद होत तंबूचा रस्ता पकडतात. वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाकडे फलंदाजांबरोबर उत्तम गोलंदाज सुद्धा असणे आवश्यक आहे.
भारताच्या फलंदाजांसमोर २७ नोव्हेंबर पासून सुरू होणार्या आगामी वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना करण्याचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलियात बर्याचदा भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली,आणि भारतीय संघाला विजय सुद्धा मिळवून दिला. त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक चेंडूचा सामना करणार्या खेळाडूंबद्द्ल सांगणार आहोत.
३. एमएस धोनी (९४६)
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच संकटकाळी धावून येत संघाला सांभाळताना दिसला आहे. ऑस्ट्रेलियात एमएस धोनीची कामगिरी उत्कृष्ट राहिली. धोनीने ऑस्ट्रेलियात २१ वनडे सामन्यात ६८४ धावा काढल्या, यादरम्यान त्याने ९४६ चेंडूचा सामना केला आहे. त्याचबरोबर धोनीच्या नावावर ५ अर्धशतके सुद्धा आहेत.
२. सचिन तेंडुलकर (१०४६)
भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलिया विरुद्ध इतर भारतीयांच्या तुलनेत सर्वाधिक वनडे सामने खेळलेत. परंतू अधिक वनडे सामने खेळूनसुद्धा सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक चेंडू खेळण्याच्या यादीत दुसर्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियात सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २५ वनडे खेळत ७४० धावा काढल्या. यादरम्यान त्यानी १०४६ चेंडूचा सामना केला आहे .
१. रोहित शर्मा (१०८८)
आगामी वनडे मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर असलेल्या रोहित शर्माची कामगिरी दोन्ही देशात सुद्धा जबरदस्त राहिली. रोहितची उत्कृष्ट कामगिरी पाहून हे बोलणे चुकीचे नाही ठरणार की, भारत या दौऱ्यात आपल्या प्रमुख फलंदाजाची नक्कीच कमी जाणवेल. रोहितने ऑस्ट्रेलियात त्यांच्याच या संघाविरुद्ध १९ सामने खेळताना ५८ पेक्षा अधिक सरासरीने ९९० धावा केल्या. या सामन्यात रोहित शर्माने सर्वात जास्त १०८८ चेंडूंचा सामना केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“आमचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार” ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने फुंकले रणशिंग
“मी फॉर्ममध्ये आलोय !” ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे भारतीय संघाला आव्हान
“युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही”, धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराज गायकवाडने सोडले मौन
ट्रेंडिंग लेख –
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज
विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक