क्रिकेट या खेळात फलंदाजाला आपली विकेट संभाळून धावा काढाव्या लागतात. कित्येकदा धावा काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज आपली विकेट गमावतात तर बर्याचदा फलंदाज विकेट वाचताना खूपच संथ गतीने खेळतात. अशा मध्ये फलंदाजाला विकेट वाचताना व धावा काढताना संतुलन बनवून खेळावं लागते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्या वनडे मालिकेत भारतीय फलंदाजांची कठीण परीक्षा असणार आहे. भारत वनडे मालिकेत तेव्हाच यश मिळवू शकतो, जेव्हा त्यांचे फलंदाज विकेट वाचवून धावा करतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २७ नोव्हेंबर पासून सिडनी येथे वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. भारतीय संघाचा सामना जेव्हा ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे प्रकारात झाला आहे, तेव्हा दोन्ही संघाकडून अटीतटीची लढाई पाहायला मिळाली आहे. बर्याचदा भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत नाबाद राहिले आहेत. एक फलंदाज जेव्हा डाव संपल्यानंतर ही बाद होत नाही, त्याला नाबाद खेळाडू म्हणलं जाते. हा कारनामा बर्याचदा भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला आहे.
या लेखामधून अशा ३ भारतीय खेळाडूंबद्द्ल जाणून घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिकवेळा
नाबाद राहण्याचा विक्रम केला आहे.
३. कपिल देव (६)
भारतीय संघाला १९८३ मध्ये सर्वप्रथम वनडेत विश्वचषक कपिल देव यांनी जिंकून दिला. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४१ वनडे सामने खेळलेत. त्यापैकी ३८ डावात फलंदाजी करताना ६ वेळा ते नाबाद राहिलेत. त्यांनी ४१ सामन्यात फलंदाजी करताना ६५५ धावा काढल्या आणि यामधे १ अर्धशतक झळकावले.
२. मोहमद अझरुद्दीन (६)
भारताचे माजी फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन हे त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीत मनगटाचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यासाठी ओळखले जातात. अझरुद्दीन यांनी आपल्या कारकीर्दीत वनडेत बर्याचदा मोठ्या खेळी केल्या आहेत. अझरुद्दीन आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यकाळात ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४३ वनडे सामन्यात ४१ डावात फलंदाजी करताना ६ वेळा नाबाद राहिले आहेत. अझरुद्दीनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत ९९० धावा केल्यात आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक वेळा नाबाद राहणारा दुसरा खेळाडू आहे.
१. एमएस धोनी (११)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा ‘कॅप्टन कूल’ या नावाने प्रचलित आहे. एमएस धोनीची ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत उल्लेखनीय कामगिरी राहिली. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यकाळात ५५ वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी ४८ डावात फलंदाजी करताना ११ वेळा तो नाबाद राहिला आहे आणि त्याच्या नावावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध १६६० धावा आहेत. यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद १३९ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
होय, आम्ही स्लेजिंग करणार! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे भारतीय संघाला खुले आव्हान
जसप्रीत बुमराह देतोय युवा कार्तिक त्यागीला गोलंदाजीचे धडे, पाहा फोटो
ट्रेंडिंग लेख
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारे ३ भारतीय फलंदाज; धोनीचाही समावेश
या पाच सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी गाजवली होती ऑस्ट्रेलियाची मैदाने
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज