इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरु झाल्यापासून खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळालं आहे. याचा फायदा घेत बर्याच खेळाडूंनी आपले नावलौकिक केले. जगातील सर्वोत्कृष्ट स्पर्धेमधील आयपीएलचा फायदा केवळ भारतीय खेळाडूंनाच नव्हे तर परदेशी खेळाडूंनाही झाला.
रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन या बर्याच भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी आयपीएलमधील कामगिरीचा त्यांना चांगलाच फायदा झाला. यासह, अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय संघात जबरदस्त पुनरागमन केले.
पण काही खेळाडू एकाच मोसमात चमकले आणि नंतर नाहीसे झाले. असे अनेक खेळाडू आयपीएल खेळले जे आज कोणाला आठवतही नसतील. त्यातील ३ खेळाडूंचा या लेखात आढावा घेतला आहे.
१. रितेंदर सिंह सोढ़ी (Reetinder Singh Sodhi)
२००० मध्ये भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करणारा रितेंद्र सिंग सोढ़ी आपल्या कारकीर्दीत एकूण १८ वनडे सामने खेळला. या सामन्यांत त्याने २५.४५ च्या सरासरीने २८० धावा केल्या तसेच ५ विकेट घेतल्या. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध २००० मध्ये पदार्पण केले आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २००२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता.
रितेंदर सिंग सोढ़ीही आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. सोढ़ी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमधील कारकीर्दीत फक्त ३ सामने खेळले आणि सर्व सामने त्याने २०१० मध्ये खेळले. रितेंद्र सिंग सोढ़ीला ३ सामन्यांपैकी एकाच सामन्यात फलंदाजी मिळाली. त्यात त्याने फक्त ४ धावा केल्या आणि त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही.
२. संजय बांगर (Sanjay Bangar)
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगरने २००१ मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत बांगरने १२ कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले. या सामन्यांत त्याने एकूण ६५० धावा केल्या आणि १४ बळीही घेतले. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २००४ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध खेळला होता. संजय बांगर हा भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षकही होता.
आयपीएलमध्ये तो डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसला. आयपीएल कारकीर्दीत संजय बांगर यांनी १२ सामने खेळले असून त्यात त्याने ४९ धावा केल्या आणि ४ बळीही घेतले.
३. आकाश चोप्रा (Aakash Chopra)
भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १० कसोटी सामने खेळले. यात त्याने २ अर्धशतकांसह २३ च्या सरासरीने ४३७ धावा केल्या. आकाश चोप्राने आपला शेवटचा सामना २००४ मध्ये खेळला होता. निवृत्त झाल्यानंतर आकाश चोप्राने समालोचन करण्यास सुरवात केली आणि चाहत्यांनाही त्याचे समालोचन खूप आवडते.
मात्र, भारताकडून फक्त कसोटी क्रिकेट खेळणारा आकाश चोप्रा आयपीएलमध्ये ७ सामने खेळला आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. दरम्यान, त्याने ७ सामन्यात ५३ धावा केल्या, २००९ मध्ये शेवटचा आयपीएल सामना तो खेळला.
ट्रेंडिंग लेख –
४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…
वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज
या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल
महत्त्वाच्या बातम्या –
गांगुलीचा महिला आयपीएलच्या आयोजनासाठी हिरवा कंदील; यावेळी होऊ शकतात सामने
या दिग्गजाने निवडला भारत-ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा मिळून सर्वोत्तम कसोटी संघ
अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…