ऑस्ट्रेलियन संघ वनडे क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलियाने ५ वेळा वनडे विश्वचषक जिंकत, या प्रकारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियन संघाची वन-डे क्रिकेटमध्ये तितकी चांगली कामगिरी झाली नाही. मात्र, एक काळ असा होता की, वनडे क्रिकेटमध्ये या संघाचा पराभव करणे इतर संघासाठी जवळजवळ अशक्य होते. ऑस्ट्रेलियन संघात असे, अनेक धुरंदर फलंदाज आणि गोलंदाज होते, जे विरोधी संघांना नामोहरम करत.
वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडे ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली आणि शेन वॉर्नसारखे दिग्गज गोलंदाज होते. त्यांच्यासमोर फलंदाज सहज धावा करू शकत नव्हते. भारताच्या सचिन तेंडुलकर व व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी अशा परिस्थितीतही, वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर अधिराज्य गाजवले होते. सचिनने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल ८ वनडे शतके साजरी केली आहेत. मात्र, भारताचे असे काही दिग्गज फलंदाज होऊन गेले, ज्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही वनडे शतक ठोकता आलेले नाही.
आज आपण त्याच तीन भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत,ज्यांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये एकदाही शतक साजरे करता आले नाही.
३) मोहम्मद अझरुद्दिन
सलग तीन विश्वचषकात भारताचे कर्णधारपद भूषवलेला मोहम्मद अझरुद्दिन हा भारताच्या यशस्वी वनडे खेळाडूंपैकी एक आहे. अझरने आपल्या कारकीर्दीत ३०० हून अधिक वनडे सामने खेळले. या सामन्यातून त्याच्या नावे ९,००० पेक्षा जास्त धावा जमा आहेत आहेत. वनडे क्रिकेटमध्ये अझरने ७ शतकेही ठोकली होती. मात्र, अझरला आपल्या वनडे कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधीही शतक ठोकता आले नाही. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ४१ वनडे डावात ६ अर्धशतके झळकावली होती.
२) सुनील गावसकर
भारताच्या सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये माजी सलामीवीर सुनील गावसकर यांचे नाव नेहमी समाविष्ट असेल. आपल्या सर्वांगसुंदर फलंदाजीने गावसकरांनी जगभरातील तमाम गोलंदाजांविरूद्ध खोर्याने धावा काढल्या. सुनील गावसकर यांनी आपल्या फलंदाजीने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:चे मानाचे स्थान निर्माण केले. गावसकर यांच्या नावे ३४ कसोटी शतके जमा आहेत. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये त्यांच्या पदरी काहीशी निराशा पडली. गावसकर आपल्या कारकीर्दीत केवळ एक वनडे शतक झळकावू शकले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या २७ सामन्यात त्यांना एकदाही शतकाची वेस ओलांडता आली नाही.
१) राहुल द्रविड
‘द वॉल’या नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा जगभरातील काही मोजक्या खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे, ज्यांनी कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त जमवल्या आहेत. द्रविडने क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारात अफाट यश संपादन केले आहे. मात्र, द्रविडला कसोटीपटू म्हणूनच जास्त ओळख मिळाली.
द्रविडने आपल्या वनडे कारकिर्दीत ३१८ डावात १२ शतके ठोकली आहेत. परंतु, या १२ शतकांपैकी एकही शतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आलेले नाही. द्रविडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ४८ सामन्यात ८ अर्धशतके झळकावली आहेत.
ट्रेंडिंग लेख –
‘चकदाह एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी; वाचा तिच्याबद्दल १० मनोरंजक गोष्टी
क्रिकेट इतिहासातील ३ सर्वात वादग्रस्त पंच, ज्यांचा पाकिस्तानशी आहे संबंध
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत विराटची उणीव भरून काढू शकतील असे ५ क्रिकेटर्स
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! विराट कोहली बनू शकतो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू
काय सांगता ! आपला झहीर खान होणार आमदार ?
भारतात क्रिकेटला पुन्हा सुरुवात! पहिल्याच सामन्याच मनोज तिवारी चमकला