भारतीय आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आगामी काळात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू नेटमध्ये घाम गाळतोय. असे असूनही मात्र आगामी मालिकेत सर्वांचे लक्ष भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार कोहलीवर असेल. या मालिकेत काही खास विक्रम करण्याची संधी त्याच्याकडे असेल.
ऑस्ट्रेलियामध्ये 10 शतके ठोकणारा विराट बनू शकतो पहिला खेळाडू
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा कसोटी शतके ठोकली आहेत आणि वनडेमध्ये तीन शतके ठोकली आहेत. तिन्ही स्वरूपात त्याने एकूण 9 शतके केली आहेत. जर वनडे किंवा टी20 सामन्यात विराटने आणखी एक शतक ठोकले, तर तो ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 शतके ठोकणारा क्रिकेट इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल. विराटने सध्या इंग्लंडचा फलंदाज जॅक हॉब्सची बरोबरी केली आहे. हॉब्सने ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतके ठोकली आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
९ – जॅक हॉब्स
९ – विराट कोहली
७ – विवियन रिचर्ड्स
७ – सचिन तेंडुलकर
७ – वॅली हेमंड
कसोटीत शतक ठोकून विराट सचिन तेंडुलकरला टाकू शकतो मागे
जर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत एक शतक ठोकले, तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कसोटी शतके ठोकण्याच्या बाबतीत तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सहा कसोटी शतके ठोकून तो सचिनच्या बरोबरीत आहे.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 11 शतके ठोकली आहेत. सन 2015 च्या आयसीसी विश्वचषकात त्याने पाकिस्तानविरुद्ध 107 धावा केल्या होत्या. सन 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध तिरंगी मालिकेत खेळताना त्याने हॉबर्टमध्ये 133 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिलाच कसोटी सामना खेळून विराट भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. त्यामुळे जर त्याला सचिनचा विक्रम मोडायचा असेल, तर पहिल्याच कसोटीत शतक ठोकावे लागेल.
कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
९ – जॅक हॉब्स
७ – वॅली हेमंड
६ – सचिन तेंडुलकर
६ – विराट कोहली
६ – हर्बर्ट सटक्लिफ
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता ! आपला झहीर खान होणार आमदार ?
भारतात क्रिकेटला पुन्हा सुरुवात! पहिल्याच सामन्याच मनोज तिवारी चमकला
धोनीला दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडूसाठी आयसीसीकडून नामांकन; काय आहे त्याची कामगिरी, वाचा
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत विराटची उणीव भरून काढू शकतील असे ५ क्रिकेटर्स
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव वॉलाही ‘त्यादिवशी’ दादाने टॉससाठी पहायला लावली होती वाट
१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…






