दरवर्षीप्रमाणेच या मोसमातही मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये खूपच चांगले प्रदर्शन केले आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना केल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या खेळात सातत्याने सुधारणा केली आहे. याबरोबरच संघ आता गुणतालिकेत १० गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. या आयपीएल हंगामात आतापर्यंत मुंबई इंडियन्सने ७ सामने खेळले आहेत आणि ५ सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई व्यतिरिक्त या संघाचा सुपर ओव्हरमध्ये आरसीबीने पराभव केला. तसं पाहिलं तर या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा खेळ अपेक्षेप्रमाणे चांगला नव्हता.
परंतु, बाकी सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात प्रत्येक संघाविरूद्ध मुंबई इंडियन्सने धमाकेदार खेळ दाखवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मुंबई इंडियन्सने चमकदार कामगिरी बजावताना विरोधी संघांना रणनीती बनवण्याची संधी दिली नाही. शेवटच्या षटकातही मुंबईची फलंदाजी जबरदस्त होताना दिसली. आता, अंतिम अकराचा योग्य संघ मैदानावर येत आहे, त्यात क्वचितच बदल पहायला मिळाला असेल. जर पुढील दोन सामने मुंबई इंडियन्सने गमावले तर कदाचित रोहित शर्मा अंतिम अकरामध्ये नवीन खेळाडूंचा समावेश करण्याची चूक करणार नाही. हे देखील असू शकते की काही दिग्गजांना संपूर्ण हंगाम बेंचवरच घालवावा लागेल. या लेखात मुंबईच्या अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांना कदाचित संपूर्ण हंगाम न खेळता राहावे लागू शकते.
मुंबई इंडियन्सचे हे ३ खेळाडू संपूर्ण हंगामात राहू शकतात बाहेर
नॅथन कुल्टर नाईल
या खेळाडूची मजबूत गोलंदाजीची क्षमता आहे आणि फलंदाजीमध्ये काही मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता आहे. नॅथन कुल्टर नाईलला अंतिम अकरामध्ये संधी मिळवायची असेल, तर ट्रेंट बोल्ट किंवा जेम्स पॅटिन्सन या दोघांपैकी एकाला बाहेर बसावे लागेल. परंतु या दोघांनाही उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यामुळे या हंगामात कुल्टर नाईलला संधी मिळणे कठीण आहे.
मिशेल मॅक्लेनघन
रोहित शर्माचा या वेगवान गोलंदाजावर विश्वास आहे आणि गेल्या काही मोसमात त्याने आपल्या शानदार गोलंदाजीने मुंबईला अनेक सामने जिंकण्यात मोलाचे योगदान दिले. या हंगामात इतर दोन परदेशी गोलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत, तर कायरन पोलार्ड अष्टपैलू म्हणून खेळत आहे. अशा परिस्थितीत मिशेल मॅकक्लेनघनचे संघात कोणतेही स्थान राहणार नाही.
ख्रिस लिन
मुंबई इंडियन्सने ख्रिस लिनला त्यांच्या संघात दोन कोटी रुपयांमध्ये घेतले आहे. पण त्याला संघात स्थान मिळणे कठीण आहे. या हंगामात क्विंटन डी कॉकने काही वेळा चांगली फलंदाजी केली आहे. याशिवाय डी कॉक- रोहित शर्मा ही सलामी जोडी चांगली कामगिरी करत आहे. यामुळे ख्रिस लिन अंतिम अकरामध्ये प्रवेश करू शकत नाही. तसेच त्याला गोलंदाजांच्या जागी समाविष्ट करता येणार नाही आणि पोलार्डला अंतिम अकरामधून वगळता येणार नाही, त्यामुळे ख्रिस लिनला संघाच्या अंतिम अकरामध्ये प्रवेश मिळणार नाही.
ट्रेंडिंग लेख-
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
-३ सलामीवीर जे या आयपीएल हंगामात करु शकतात खालच्या क्रमांकावर फलंदाजी
-मुंबई विरुद्ध दिल्ली सामना होता फिक्स? पाहा का होतायत आरोप
महत्त्वाच्या बातम्या-
-अफलातून! डिविलियर्सने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेरील चालत्या कारवर, पाहा व्हिडिओ
-मिस्टर ३६०ची ‘ही’ करामत पाहून कोणताही गोलंदाज म्हणेल, याला बॉलिंग नकोच