भारतीय संघाचा नियमित फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. चहल नेहमीच भारतीय संघासाठी एक भरावशाचा खेळाडू राहिला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यातील त्याची कामगिरी खराब होत आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. असे असतानाच अगामी काळात भारताला टी२० विश्वचषक खेळायचा आहे. या विश्वचषकापूर्वी चहल फॉर्ममध्ये परतने गरजेचे आहे. असे झाले नाही तर भारताकडे त्याच्याऐवजी कोणते तीन गोलंदाजांचे पर्याय आहेत, याबद्दल जाणून घेऊ.
वरुण चक्रवर्ती
‘मिस्ट्री गोलंदाज’ वरुण चक्रवर्तीने गेले दोन आयपीएल सामने गाजवले. त्याच्या अचूक टप्प्याने क्रिकेटच्या दिग्गजांना प्रभवित केले आहे. येत्या काळात चक्रवर्ती जर तंदुरुस्ती चाचणीमध्ये जर पास झाला तर, येत्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी आपली जागा पक्की करु शकतो. आयपीएलमध्ये चक्रवर्तीने २१ सामने खेळले आहे त्यात त्याने २५ गडी बाद केले आहे. म्हणून चहलच्या जागी वरूण चक्रवर्तीला संधी मिळू शकते.
राहुल चाहर
मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा खेळाडू राहुल चाहरनेही आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. सध्या झालेल्या इंग्लंड विरुद्ध मालिकेत राहुलने प्रभावी मारा करून कोहली आणि निवड समितीवर आपली छाप सोडली होती. राहुलकडे टी२० सामन्यांचा चांगलाच अनुभव आहे. आयपीएलमध्ये ३८ सामने खेळून ४१ गडी त्याने बाद केले आहेत. निश्चितच चहलच्या जागी राहुल चाहर एक योग्य पर्याय होऊ शकतो.
कुलदीप यादव
तसे तर कुलदीप आणि चहल हे दोघेही एकत्र भारतासाठी हिट जोडी ठरली होती. प्रेक्षकांनी ह्या जोडीला ‘कुलचा’ असे नावही दिले होते. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना एकत्र संधी दिली जात नाहीये. असे असताना जर चहल फ्लॉप ठरत असताना कुलदीप त्याची जागा घेऊ शकतो. कुलदीपकडेसुद्धा टी२० सामन्याचा चांगला अनुभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा फलंदाजीत हातखंडा असलेल्या द्रविडने घेतल्या होत्या २ विकेट्स, फिरवला होता सामना
बाबर आझम पहिलाच नाही, तर ‘या’ ३ क्रिकेटपटूंनीही यापूर्वी केले आहे बहिणीशी लग्न
वयाची पस्तीशी ओलांडल्यावर ‘या’ फलंदाजांनी झळकावले पहिले वनडे शतक, गावसकरांचही यादीत नाव