भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या संघात लंका प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान मिळालं आहे. या मालिकेसाठी चरित असलंकाची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.
भारताशी सामना करण्यासाठी श्रीलंकेच्या संघात अनेक उत्कृष्ट खेळाडू आहेत. यातील काही खेळाडू असे आहेत, ज्यांच्याकडे एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला श्रीलंकेच्या अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे टी20 मालिकेत भारतासाठी मोठा धोका ठरू शकतात.
(3) कुसल परेरा – कुसल परेरा हा अतिशय आक्रमक फलंदाज आहे. वरच्या क्रमांकावर खेळताना त्याच्याकडे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामना फिरवण्याची क्षमता आहे. अलीकडेच त्यानं लंका प्रीमियर लीगमध्ये 52 चेंडूत 102 धावांची शानदार खेळी केली होती. त्यानं या स्पर्धेत 169 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली, यावरून तो किती धोकादायक फलंदाज आहे हे दिसून येतं. अशा स्थितीत टीम इंडियाला त्याच्यापासून सावध राहावं लागणार आहे.
(2) दिनेश चंडिमल – दिनेश चंडिमलचं प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीलंकेच्या टी20 संघात पुनरागमन झालं आहे. त्यानं दोन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध शेवटचा टी20 खेळला होता. आता त्यानं टीम इंडियाविरुद्धच पुनरागमन केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. चंडिमल हा खूप अनुभवी खेळाडू आहे. 2014 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचा तो भाग होता. अशा स्थितीत त्याचा अनुभव श्रीलंकेसाठी खूप उपयोगी ठरू शकतो.
(1) वनिंदू हसरंगा – वनिंदू हसरंगा हा एक असा खेळाडू आहे, ज्याच्याकडे चेंडू आणि बॅट दोन्हीनं सामना फिरवण्याची क्षमता आहे. 13 विकेट घेण्यासोबतच त्यानं लंका प्रीमियर लीगमध्ये 131 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 179.45 होता. हसरंगाला आयपीएलसह जगभरातील टी20 लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. अशा परिस्थितीत तो एक असा खेळाडू आहे, जो भारतीय संघासाठी मोठं आव्हान ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
“मोठ्यांना कसे बोलावे शिकवले नाही का?” माजी पाकिस्तानी खेळाडूनं मोहम्मद शमीला खडसावलं
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, स्टार खेळाडूचं दोन वर्षांनंतर पुनरागमन
टीम इंडियाचे 5 ‘अमीरजादे’, फक्त लक्झरी कार आणि बाईकच नाही तर प्रायव्हेट जेटचे देखील आहेत मालक