इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील साखळी फेरीतील शेवटचा सामना मंगळवारी (3 नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. अटीतटीच्या या सामन्यात हैदराबादने मुंबईचा 10 विकेट्सने दारुण पराभव झाला. या विजयासह हैदराबाद प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा चौथा संघ ठरला.
या लेखात आपण मुंबईच्या पराभवाची प्रमुख 3 कारणे पाहणार आहोत.
मुंबईने गमावले नाणेफेक
शारजाहच्या खेळपट्टीवरील लक्ष्याचा पाठलाग करणार्या संघाला फायदा होताना दिसतो. सुरुवातीस, खेळपट्टीवर भरपूर आर्द्रता असते आणि चेंडू स्विंगही होतो. हे पाहता सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाची निवड केली. मुंबई इंडियन्सला नाणेफेक गमावण्याचा फटका बसला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकला असता, तर कदाचित त्यानेही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असता आणि सामन्याची स्थिती वेगळी असती.
संदीप शर्माची उत्कृष्ट गोलंदाजी
सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज संदीप शर्माने खेळपट्टीचा लाभ घेतला आणि मुंबईच्या तीन मुख्य फलंदाजांना बाद केले. त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि युवा फलंदाज इशान किशनला बाद केले. संदीपने मुंबईला कमी धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने टाकलेल्या 4 षटकांत 34 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले.
वॉर्नर-साहा यांची फलंदाजी
मुंबईने दिलेल्या 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चाहत्यांना चुरशीच्या लढतीची अपेक्षा होती. परंतु सलामीवीर डेविड वॉर्नर आणि वृद्धिमान साहाने तसे होऊ दिले नाही. सुरुवातीला साहाने आक्रमक फलंदाजी केली आणि नंतर डेविड वॉर्नरनेही मोठे फटके मारले. या दोघांनीही मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हैदराबादने एकही बळी न गमावता 17.1 षटकांत हे लक्ष्य सहजपणे गाठले. वॉर्नरने नाबाद 85 केल्या आणि साहाने नाबाद 58 धावांची खेळी केली.
अबु धाबी येथे शुक्रवारी (६ नोव्हेंबर) एलिमिनेटर सामन्यात हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सामना करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-नादच खुळा! हैदराबादने ‘या’ विक्रमात केली मुंबई- चेन्नईसारख्या बलाढ्य संघांची बरोबरी
-मानलं पाहिजे! पराभूत होऊनही मुंबईच्या नावावर ‘मोठ्या’ विक्रमाची नोंद
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का