जगभरातील उत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड करुन आयपीएलमध्ये वेगवेगळे फ्रंचायझी तयार केले जातात. यामध्ये काही युवा तर काही दिग्गज खेळाडूंचा समावेश असतो. शिवाय हे सामने २०-२० षटकांचे असतात. त्यामुळे आयपीएल पाहायची मजा निराळीच असते.
पण, यंदा कोविड-१९ या जागतिक महामारीचे सावट पूर्ण जगावर परसलेले आहे. त्यामुळे २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलचा १३वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. असे असले तरी, फक्त चाहतेच नव्हे तर बीसीसीआयचे अधिकारीदेखील आयपीएल २०२०ची आतुरतेेने वाट पाहत आहेत. यामागचा दोघांचाही हेतू जरी वेगवेगळा असला, तरी सर्वांची इच्छा आहे की आयपीएलची सुरुवात व्हावी.
असे अंदाज वर्तवले जात आहेत की, ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाला पुढे ढकलण्यात आल्यास आयपीएलच्या आयोजनाचे मार्ग खुले होतील. हे खरे आहे की, आयपीएल न झाल्यास बीसीसीआय, आयपीएल फ्रंचायझी, संबंधित इतर कर्मचारी आणि खेळाडूंना आर्थिक नुकसान होऊ शकते. पण परिस्थिती जरी थोडीफार आटोक्यात आली असली, तरी यंदा आयपीएलचे आयोजन करणे खूप कठीण आहे.
या लेखात ती ३ मोठी कारणे सांगण्यात आली आहेत, ज्यांमुळे आयपीएलचा १३वा हंगाम आयोजित नाही केला पाहिजे- 3 Reasons Why IPL 2020 Should Not Happen
३. दर्शकांविना आयपीएलचा रोमांच कमी होईल :
आयपीएलची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ‘दर्शक’. मग, सामना कुठेही होत असला तरी प्रत्येक स्टेडियम दर्शकांनी खचाखच भरलेले असते. चाहते आपापल्या संघाला पाठींबा देण्यासाठी मोठ्या गर्दीने स्टेडियममध्ये उपस्थित राहायचे. परंतु, सध्याची परिस्थिती लक्षात घेता. आयपीएलचे आयोजन जरी करण्यात आले तरी दर्शकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात येणार नाही. अर्थात सामने बंद स्टेडियममध्ये घेण्यात येतील.
दर्शकांविना आयपीएलच्या सामन्यांची कल्पना केल्यास, सामना टिव्हीवर पाहायलाही रोमांचक वाटणार नाही आणि खेळाडूंचा उत्साहदेखील तेवढा नसणार जेवढा दर्शक असताना असतो. त्यामुळे आयपीएल आयोजित जरी केले, तरी त्याची रोमांचकता जास्त नसणार.
२. खेळाडूंच्या आरोग्याची जोखीम :
जर आयपीएलचे आयोजन करण्यात आले. तर, ८ संघांचे खेळाडू नक्कीच एकत्र येतील. शिवाय त्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करावा लागेल. कारण, एकाच स्टेडियममध्ये आयपीएलचे सर्व सामने तर घेतले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सराव करणे, सामना खेळणे, सामन्यांसाठी प्रवास करणे या गोष्टींमुळे खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता वाढू शकते.
जरी खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले किंवा कितीही सावधानी बाळगण्यात आली, तरी खेळाडूंच्या स्वास्थावर कोविड-१९ या महामारीच्या धोक्याचे सावट मात्र राहणारच.
१. परदेशी खेळाडूंमुळे कोरोना व्हायरसचा धोका जास्त :
सर्वजण या गोष्टीशी परिचित आहेत की आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. जर आयपीएलचा १३वा हंगाम घेण्यात आला, तर परदेशी खेळाडू नक्की खेळणार. हे निश्चित आहे की, परदेशी खेळाडू किंवा संघ आल्यास पूर्ण सावधानी बाळगली जाईल. त्यांना क्वारंटाइन करण्यात येईल. परंतु, कोविड-१९चा प्रसार होण्याची शक्यता तरीही पूर्णपणे टाळली जाऊ शकत नाही.
प्रत्येक देशातील वातावरण वेगवेगळे असते आणि अशा परिस्थितीत त्या खेळाडूच्या स्वास्थावर इतर देशातील वातावरणाचा काय प्रभाव पडेल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका कायम राहू शकतो.
ट्रेंडिंग लेख-
वनडेत सर्वाधिक वेळा नर्वस नाइंटीजचे शिकार झालेले ५ भारतीय, तिसरे नाव आहे विशेष
कसोटी, वनडे आणि टी२०त सर्वाधिक महागडे षटक टाकणारे ३ भारतीय गोलंदाज
एक नकोसा तर दोन हवेहवेसे विक्रम ‘द वाॅल’ राहुल द्रविडच्या…