fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

लॉकडाउनमध्ये घरी बसून विराटने केली कोट्यावधी रुपयांची कमाई

मुंबई । क्रिकेटच्या मैदानावर विक्रमांचे थर उभे करणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. इन्स्टाग्रामवर प्रायोजित पोस्टच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार ‘किंग’कोहली या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

12 मार्च ते 14 मार्च या दरम्यान कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प होत्या. ‘अटेन’ने दिलेल्या केलेल्या आकडेवारीनुसार, कोहलीने प्रायोजित पोस्टसाठी एकूण 379,294 पौंड म्हणजे ( 3.6 कोटी रुपये) ची कमाई केली. प्रत्येक पोस्टला 126,431 पौंड (जवळ-जवळ 1.2 कोटी रुपये) कमविले

पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा यादीत पहिल्या स्थानावर आहे. ज्याने जवळजवळ 18 लाख पाऊंड म्हणजे(17.9 कोटी रुपये) तर अर्जेंटीना आणि एफसी बार्सिलोना स्टार लियोनल मेसी(12 लाख पौंड म्हणजे 12.3 कोटी रुपये) पीएसजीच्या नेमारने (11 लाख पौंड म्हणजे  11.4 कोटी रुपये)ची कमाई करत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

बास्केटबॉलपटू खिलाड़ी शाक्विले ओनील (583,628 पौंड म्हणजे  5.5 कोटी रुपये) आणि इंग्लंडचा माजी फुटबॉल कर्णधार डेविड बेकहम (405,359 पौंड) ची कमाई करुन अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. स्वीडनचा फुटबॉलपटू ज्लाटन इब्राहिमोविच (184,413 पौंड, म्हणजे 3.8 कोटी रुपये), एनबीएचा माजी स्टार ड्वेन वेड (143,146 पौंड), ब्राजीली फुटबॉलर दानी एल्व्स (133,694 पौंड) आणि बॉक्सर  अँथोनी जोशुआ (121,500 पौंड) या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.

You might also like