माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा एमएस धोनीवर जोरदार टीका केली आहे. स्वत: भारताकडून खेळलेले योगराज सिंग भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनीवर नेहमी सार्वजनिक व्यासपीठावर टीका करत असतात. ज्यामध्ये ते एमएस धोनीने त्याचा मुलगा युवराजची कारकीर्द बरबाद केल्याचा आरोप करतात. अलीकडेच धोनीवर केलेल्या टीकेमध्ये योगराज यांनी धोनीला आयुष्यात कधीही माफ केले जाणार नाही, असे म्हटले आहे. योगराज यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
झी स्विच यूट्यूब चॅनलशी बोलताना योगराज म्हणाले- “मी एमएस धोनीला माफ करणार नाही. त्याने आरशात आपला चेहरा पाहावा. तो एक महान क्रिकेटर आहे. पण त्याने माझ्या मुलाचे नुकसान केले आहे.आयुष्यात मी त्याला कधीही माफ करणार नाही. ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यांना कधीच माफ करत नाही. मग ते माझ्या कुटुंबातील सदस्य असोत किंवा इतर कोणीही असोत.
करिअरमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप
धोनीवर योगराज सिंगचा सर्वात मोठा आरोप म्हणजे त्याने युवराजच्या करिअरमध्ये जाणीवपूर्वक ढवळाढवळ केली. ते म्हणतात की धोनीने आपल्या निर्णयांनी युवराजची कारकीर्द लहान केली. ही भारतीय क्रिकेटसाठी मोठी हानी आहे. धोनीने हस्तक्षेप केला नसता तर युवराज आणखी 4-5 वर्षे खेळू शकला असता, असा दावा योगराज यांनी केला आहे. योगराज यांच्या मते 2011 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय म्हणजे युवराजच्या वैभवाचा क्षण हिरावून घेण्यासारखा होता.
2015 विश्वचषकातून मुद्दाम बाहेर ठेवले
2015 क्रिकेट विश्वचषकासाठी युवराज सिंगला भारतीय संघातून वगळणे हे योगराज सिंगच्या रागाचे एक प्रमुख कारण आहे. योगराजने अनेकदा या निर्णयासाठी धोनीला जबाबदार धरले आहे आणि असा दावा केला आहे की चांगला फॉर्म असूनही त्याचा मुलगा अन्यायकारकपणे बाहेर पडला.
वैयक्तिक नाराजी
योगराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील मतभेद केवळ व्यावसायिक कारणांपुरते मर्यादित नसून हा वाद वैयक्तिकही आहे. योगराजने धोनीला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला असून धोनीने आरशात आपला चेहरा बघून स्वतःलाच प्रश्न करावा, असे म्हटले आहे. ज्याने आपल्यावर अन्याय केला असेल त्याला आपण कधीही माफ केले नाही, असेही ते म्हणाले. त्याच्या आणि धोनीमधील कटुता खूप खोलवर असल्याचे त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
हेही वाचा-
बांग्लादेश मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा; मोठी अपडेट समोर
“झेंडा ऊंचा रहे हमारा”, पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी!
भारताच्या झोळीत 16वे पदक; वर्ल्ड चॅम्पियन दीप्ती जीवनजीची कांस्यची कमाई