fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

३ कधीही विचार न केलेले विक्रम आहेत भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर

भारतीय क्रिकेटने कसोटी, नंतर वनडे व आता टी२० अशी स्थित्यंतर गेल्या काही वर्षांत पाहिली आहे. दिवसेंदिवस लोकांची क्रिकेट पहाण्याची आवडत गेली तरीही क्रिकेटचे तिन्ही प्रकार भारतात मात्र तेवढ्याच आवडीने पाहिले जातात.

या सर्वच क्रिकेटमध्ये भारतीयांनी काही ना काही विक्रमही केलेले आहेत. यातील काही असे लोकप्रिय विक्रम आहेत जे अनेक क्रिकेटप्रेमींना माहित आहेत परंतु काही असेही विक्रम आहेत जे फारच थोड्या क्रिकेटप्रेमींना माहित आहे. यातील निवडक तीन विक्रम या लेखात

१. स्टुअर्ट बिन्नीची वनडेतील धमाकेदार कामगिरी (Stuart Binny)

भारताकडून वनडे डावात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम राॅजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर आहे. १७ जुन २०१४ रोजी बांगलादेशविरुद्ध ढाका येथे त्याने  ४.४ षटकांत ४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. अनिल कुंबळे यांनी २७ नोव्हेंबर १९९३ रोजी केलेला १२ धावा देत ६ विकेट्स घेण्याचा विक्रम बिन्नीने २१ वर्षांनी मोडला व आजही हा विक्रम त्याच्याच नावावर आहे. त्याला भारताकडून ६ कसोटी व १४ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. परंतु त्याला स्वत:ला सिद्ध करता आले नाही.

२. अजित आगरकरचे वनडेतील भारताकडून केलेल वेगवान अर्धशतक (Ajit Agarkar)

१४ डिसेंबर २००० रोजी भारत विरुद्ध झिंबाब्वे सामन्यात अजित आगरकरने २५ चेंडूत नाबाद ६७ धावांची खेळी केली होती. यात त्याने ४ षटकार व ७ चौकार मारले होते. यावेळी त्याने अर्धशतकी खेळी २१ चेंडूत केली होती. आगरकरने तळात फलंदाजी करताना केलेल्या या धावांमुळे भारताने निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३०१ धावा केल्या होत्या व पुढे हा सामना ३९ धावांनी जिंकला. यात अजित आगरकरला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला होता. भारताकडून राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग व कपिल देव यांनी २२ चेंडूत अर्धशतक केले आहे. त्यामुळे गेली २० वर्ष हा विक्रम आगरकरच्या नावावर आहे.

१. निलेश कुलकर्णीची पदार्पणाच्या कसोटीत पहिल्याच चेंडूवर विकेट (Nilesh Kulkarni)

कसोटी क्रिकेटमध्ये २० खेळाडूंनी कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर कसोटीत विकेट घेतली आहे. भारताकडून निलेश कुलकर्णी अशी कामगिरी करणारा पहिला तर जगातील १५वा गोलंदाज ठरला होता. निलेशने ३ ऑगस्ट १९९७ रोजी कोलंबो येथे खेळताना श्रीलंकेचा महान फलंदाज मारवान आटापटूला कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. आजही भारताकडून असा विक्रम कुणालाही जमला नाही. याच कसोटीत भारताने पहिल्या डावात ८ बाद ५३७ धावा केल्यानंतर लंकेने याला उत्तर देताना ६ बाद ९५२ धावा केल्या होत्या. पुढे निलेश भारताकडून केवळ ३ कसोटी सामने खेळला व त्यात त्याला केवळ २ विकेट्स घेता आल्या. वाचा निलेशची पुर्ण गोष्ट येथे- भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..

ट्रेंडिंग घडामोडी-

-हे आहे जगातील ५ महान क्रिकेटपटू, यात दोन आहेत भारतीय

-धोनीला स्थान न मिळालेल्या या संघात दोन भारतीयांचा समावेश

-या कारणामुळे वर्ल्डकप फायनलला धोनी आला होता युवराज आधी