---Advertisement---

आयपीएलमधील या 3 संघांच्या रडारवर शतकवीर मुशीर खान, लावू शकतात मोठी बोली

On: शुक्रवार, सप्टेंबर 6, 2024 12:45 PM
---Advertisement---

दुलीप ट्रॉफीमध्ये 19 वर्षीय मुशीर खानची बॅट आग ओकत आहे. इंडिया बी साठी खेळताना इंडिया ए विरुद्ध त्यानं शानदार फलंदाजी केली. त्यानं संंघ अडचणीत असताना शतक ठोकून डाव सांभाळला. मुशीर खानचा मोठा भाऊ सरफराज खान यानं यावर्षी इंग्लंडविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केलं होतं. यानंतर आता मुशीर खानला देखील भारतीय संघात जागा मिळेल, असं बोललं जात आहे.

आयपीएल 2025 च्या हंगामापूर्वी मेगा लिलावाचं आयोजन होणार आहे. या लिलावातही मुशीर खानवर मोठी बोली लागू शकते. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा 3 संघांबद्दल सांगणार आहोत, जे मेगा लिलावात मुशीर खानवर बोली लावू शकतात.

मुंबई इंडियन्स – आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीमपैकी एक असलेली मुंबई इंडियन्स मुशीर खानवर मोठी बोली लावू शकते. मुशीर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. तो देशांतर्गत क्रिकेटमधील एक उगवता तारा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स त्याचा आपल्या संघात समावेश करून घेण्यास उत्सुक असेल.

चेन्नई सुपर किंग्ज – आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज महेंद्रसिंह धोनीच्या उत्तराधिकारीचा शोध घेत आहे. त्यांच्या शोध मुशीर खानवर येऊन थांबू शकतो. मुशीर मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करतो. चेन्नईला देखील धोनीनंतर अशाच फलंदाजाची आवश्यकता असेल. तसेच चेन्नईसारख्या संघात समावेश झाल्यास मुशीर खानकडे शिकण्याची भरपूर संधी असेल.

पंजाब किंग्ज – चेन्नईप्रमाणे पंजाब किंग्जला देखील मधल्या फळीत एखाद्या चांगल्या भारतीय फलंदाजाची आवश्यकता आहे. मुशीर खान पंजाबची ही गरज पूर्ण करू शकतो. बोललं जात आहे की, यावर्षीच्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाबचा संघ मुशीर खानवर मोठी बोली लावू शकतो.

हेही वाचा – 

भारतात पोहोचताच न्यूझीलंडची मोठी खेळी; टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूला प्रशिक्षक बनवले
‘राहुल भाई विनम्र होता, पण गौतम खूप…’, पाहा मुख्य प्रशिक्षकांच्या कोचिंगमधील फरक
Duleep Trophy; हर्षितचं सिग्नेचर स्टाईल सेलिब्रेशन पुन्हा भोवणार? चाहत्यांचा आक्रोश!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---