१९ वर्षांखालील विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये दमदार कामगिरी करण्याची क्षमता असेल तर त्यांना भविष्यात केव्हा ना केव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायची संधी मिळते. १९ वर्षांखालील भारतीय संघ २०२०च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. मात्र, त्यांना अंतिम टप्प्यावर १९ वर्षांखालील बांग्लादेश संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. परंतु, हा सामना खूप रोमांचक झाला आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांमध्ये मैदानावरच वाद झाले होते.
जरी, १९ वर्षांखाली भारतीय संघाने तो सामना गमावला असला. तरी या टूर्नामेंटमुळे भारताला अनेक असे हिरे गवसले, जे भविष्यात भारतीय संघातील महान क्रिकेटपटू बनू शकतात. तर बघूया कोण आहेत ते ३ खेळाडू- 3 U-19 Players Can Be Superstar Of Indian Team In Future
कार्तिक त्यागी (वेगवान गोलंदाज)
१९ वर्षीय कार्तिक त्यागी हा जबरदस्त गोलंदाज आहे. एवढ्या कमी वयात तो खूप वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे तो भविष्यात उत्कृष्ट वेगवान गोलंदाज बनू शकतो. त्याने १९ वर्षांखालील विश्वचषकात आपल्या जबरदस्त वेगाने १८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपल्या वेगाने १९ वर्षांखालील बांग्लादेश संघातील फलंदाजांवर दबाव निर्माण केला होता.
भारतीय संघात वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. तसं पाहिलं तर जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव असे वेगवान गोलंदाज आहेत. परंतु, तरीही भारतीय संघाला पर्यायी वेगवान गोलंदाजाजी गरज आहे. अशात त्यागी उत्तम पर्याय बनू शकतो.
जर त्यागीला व्यवस्थित प्रशिक्षण मिळाले आणि त्याने मेहनत केली तर भविष्यात भारताचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज बनू शकतो.
रवि बिश्नोई (फिरकीपटू)
फिरकीपटू रवि बिश्नोई हा प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याने १९ वर्षांखालील विश्वचषकात आपल्या गोलंदाजीने सर्वांना पराभूत केले होते. त्याने १९ वर्षांखालील बांग्लादेश संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात १० षटके गोलंदाजी करत ३० धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर, त्याने संपूर्ण विश्वचषकात एकूण २२ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. तसेच बिश्नोई गरज पडल्यास चांगली फलंदाजीही करतो. तो भविष्यात भारतीय संघातील दमदार खेळाडू बनू शकतो.
यशस्वी जयस्वाल (सलामीवीर फलंदाज)
तंबूत राहणाऱ्या साधारण मुलापासून ते १९ वर्षांखालील विश्वचषकापर्यंत आणि पाणीपूरी विकणाऱ्या मुलापासून ते आयपीएलमद्ये कोटींची किंमत मिळणाऱ्या खेळाडूपर्यंत अशी कहाणी आहे यशस्वी जयस्वालची. तो २०२०मधील १९ वर्षांखालील विश्वचषकात मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्याने अंतिम सामन्यात सलामीला फलंदाजी करताना ८८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ८ चौकारांचा आणि एका षटकाराचा समावेश होता.
अनेक भारतीय दिग्गज क्रिकेट विश्लेषकांनी म्हटले आहे की, जयस्वालमध्ये भारतीय संघाचा महान फलंदाज बनण्याची क्षमता आहे.
ट्रेंडिंग लेख-
क्रिकेटला टाटा- बायबाय करत दुसरा व्यवसाय करणारे ५ क्रिकेटर, सचिनचा एकेवेळचा…
आयपीएलमधील ‘हे’ ३ खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात टी२० विश्वचषक
जागतिक क्रिकेटमधील ७ सर्वात आळशी क्रिकेटपटू; २ नावे आहेत भारतीय…