वेस्टइंडीज-श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत वेस्टइंडीजने पहिला कसोटी सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.क्वीन्स् पार्क, ओव्हल या मैदानावर झालेल्या सामन्यात वेस्टइंडीजने 226 धावांनी विजय मिळवला.
तसेच गेल्या 33 वर्षात जी गोष्ट वेस्टइंडीजला करता आली नाही, ती श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केली.
श्रीलंके विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात वेस्टइंडिजने 8 बाद 414 धावांवर आपला डाव घोषित केला. तर दुसरा डाव 7 बाद 223 धावांवर घोषित केला.
गेले 291 कसोटी सामने आणि 33 वर्षांनंतर असे पहिल्यांदा घडले की वेस्टइंडीजने एखाद्या कसोटी सामन्यातील दोन्ही डाव घोषित केले आहेत.
यापूर्वी वेस्टइंडीजला असे दोनदाचं करता आले आहे. 1976 साली इंग्लंडमधील अोव्हल कसोटी आणि 1985 मध्ये जॉर्जटाउन येथे न्यूझीलंड विरूद्ध त्यांनी हा कारनामा केला होता.
श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात वेस्टइंडीजने सात बाद 414 धावा केल्या. यात शेन डॉवरीचने नाबाद 125 धावा केल्या तर श्रीलंकेकडून लहिरू कुमाराने चार बळी घेतले. यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव 185 धावांवरच संपला.
दुसऱ्या डावात वेस्टइंडिजने 223 धावा करत श्रीलंकेला 453 धावांचे लक्ष दिले. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या कुशल मेेंडीस (102धावा) अपवाद वगळता कोणाचाही टिकाव लागला नाही. श्रीलंकेचा दुसरा डाव 226 धावांवर आटोपला.
महत्वाच्या बातम्या:
–एकाच दिवशी ३ दुबळ्या संघांनी ३ दिग्गज संघांना चारली पराभवाची धूळ
–ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तान संघाचे बेंगलोर शहरात आगमन
–भारताचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला बीसीसीआयने दाखवला बाहेरचा रस्ता
-इंग्लंड-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत डेव्हिड वार्नरकडे मोठी जबाबदारी