रविवारी (22 डिसेंबर) कटकचा बाराबती स्टेडियम (Cuttack Barabati Stadium) येथे भारत आणि विंडीज (India vs Windies) संघात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील (ODI Series) अंतिम आणि निर्णायक (The deciding match) सामना पार पडणार आहे.
यासामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चांगली कामगिरी करतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विंडीजविरुद्ध खेळलेल्या पहिल्या 2 वनडे सामन्यात विराट कोहलीने फक्त 4 धावा केल्या होत्या.
तसं पाहिलं तर विराटने कटकच्या बाराबती या मैदानावर यापूर्वी सर्व क्रिकेट प्रकारातील मिळून 4 सामने खेळले आहेत. परंतु, त्यामध्ये त्याने केवळ 34 धावा केल्या आहेत. त्याला या मैदानावर आत्तापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही.
ही आकडेवारी पाहता आणि मागील 2 सामन्यातील खराब कामगिरी (Poor Performance) पाहता विराट तिसऱ्या वनडे सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. तसेच बाराबती स्टेडियमवरील त्याची आकडेवारीही सुधारण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
मागील कामगिरी लक्षात घेता विराटने शनिवारी (21 डिसेंबर) नेट्समध्ये सराव केला आहे. यावेळी विराटने मैदानी आणि हवेतील अशा दोन्ही प्रकारच्या फटक्यांचा सराव केला.
वनडेमध्ये सर्वात वेगवान 10 हजार धावा बनविणाऱ्या विराटला पहिल्या दोन वनडे सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करण्यापासून रोखले होते. चेन्नईमधील पहिल्या सामन्यात विराटने केवळ 4 धावा केल्या. तर, विशाखापट्टनममधील दुसऱ्या वनडे सामन्यात तो 6 वर्षानंतर शून्यावर बाद झाला.
कटकच्या या मैदानात विराटने 3 वनडे आणि 1 टी20 (T20) सामना खेळला आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे 3, 22,1 आणि 8 धावांची खेळी केली आहे. भारतातील खेळलेल्या सर्व मैदानांच्या तुलनेत कटकवरील विराटची कामगिरी खूपच खराब आहे.
आज भारत विरुद्ध विंडीज संघातील अंतिम सामन्याला 1.30 वाजता सुरूवात होणार आहे.
मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी म्हणतो, आयपीएलमध्ये ही गोष्ट करणे सर्वात कठीण
वाचा- 👉https://t.co/tD8MkmD1oK👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
शिवम दुबे आणि जेसन होल्डरचा हा खास व्हिडिओ सोशल मिडियावर होत आहे व्हायरल
वाचा- 👉 https://t.co/oqamvSxXUE👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #shivamdube
— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019