क्रिकेट इतिहासात अफलातून फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांची कमी नाहीये. अशात, कसोटी क्रिकेटमध्ये अधिकतर फलंदाज हळूवार धावा घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच वनडे आणि टी२० क्रिकेटमध्ये अधिकाधिक फलंदाज मोठ-मोठे शॉट्स मारत धावा घेण्याचा प्रयत्न करत असतात. काही फलंदाज असेही आहेत, ज्यांनी टी२० क्रिकेटच्या पहिल्या षटकातच चेंडूला हवेत मारत षटकार ठोकण्याचा कारनामा केला आहे.
या लेखात अशाच ४ फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्या षटकात षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, या फलंदाजांनी पहिल्या षटकात २५०पेक्षा कमी चेंडूंचा सामना करत सर्वाधिक वेळा षटके मारण्याचा हा अनोखा कारनामा केला आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटच्या पहिल्या षटकात सर्वाधिक वेळा षटकार मारणारे ४ फलंदाज
4 Batsman Who Smashed Most Number Of Sixes In International T20 Matches
४. पॉल स्टर्लिंग (८ वेळा)
आयर्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू पॉल स्टर्लिंग हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटच्या पहिल्या षटकात सर्वाधिक वेळा षटकार मारणाऱ्या फंलदाजंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. स्टर्लिंगने त्याच्या टी२० कारकिर्दीत पहिल्या षटकात २०८ चेंडूंचा सामना करत ८ वेळा षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.
स्टर्लिंगने आतापर्यंत टी२०मध्ये ७८ सामन्यात २१२४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ७१ षटकारांचा समावेश आहे.
३. मार्टिन गप्टिल (९ वेळा)
न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिल याने त्याच्या टी२० कारकिर्दीत पहिल्या षटकात ९वेळा षटकार मारत यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. यावेळी त्याने पहिल्या षटकात २४६ चेंडूंचा सामना करताना हा पराक्रम केला आहे.
गप्टिलने त्याच्या टी२० कारकिर्दीत ८८ सामने खेळत २५३६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ११९ षटकारांचा समावेश आहे.
२. ड्वेन स्मिथ (९ वेळा)
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन स्मिथने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक वेळा षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. स्मिथने पहिल्या षटकात १०३ चेंडूंचा सामना करत ९ वेळा षटकार मारले आहेत. कदाचित स्मिथने अजून एक षटकार मारला असता तर तो पहिल्या क्रमांकावर असला असता.
स्मिथने त्याच्या टी२० कारकिर्दीत ३३ सामने खेळत ५८२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ११७ षटकारांचा समावेश आहे.
१. कॉलिन मुनरो (९ वेळा)
पहिल्या चेंडूवरच ताबडतोब खेळी करणारा फलंदाज अशी कॉलिन मुनरोची ओळख आहे. न्यूझीलंडचा मुनरो याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमद्ये पहिल्या षटकात सर्वाधिक ९ वेळा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, मुनरोने पहिल्या षटकात फक्त ७९ चेंडूंचा सामना करत हा पराक्रम केला आहे. त्यामुळे तो अव्वल क्रमांकावर विराजमान आहे.
मुनरोने त्याच्या टी२० कारकिर्दीत ६९ सामन्यात १७२८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १०७ षटकारांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग लेख-
बापरे! ४० टी२० सामने खेळून एकही चौकार न मारता आलेले २ भारतीय
वनडे कारकिर्दीत २०००पेक्षा जास्त धावा करुन एकही षटकार न मारु शकलेले ३ कर्णधार