---Advertisement---

पाकिस्तानसोबत न खेळल्यास टीम इंडियाचाच तोटा; भोगावे लागतील गंभीर परिणाम

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 3:22 PM
---Advertisement---

टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. क्रिकेट चाहते २४ ऑक्टोबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळेल. परंतु हा सामना सुरू होण्यापूर्वीच हा सामना रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या १० दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरमध्ये १० लोकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे एकीकडे सर्वच या सामन्यासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे एका मोठ्या वर्गाने हा सामना रद्द करण्यात यावा अशी मागणी करायला सुरुवात केली आहे. चला तर पाहूया जर भारतीय संघाने हा सामना खेळवण्यास नकार कळवला तर याचा टी -२० विश्वचषक स्पर्धेवर काय परिणाम होऊ शकतो.

१) पाकिस्तानला मिळणार २ गुण 

जर भारतीय संघाने हा सामना खेळण्यास नकार दिला तर,पाकिस्तान संघाला २ गुण मिळतील. तर भारतीय संघाला एकही गुण मिळणार नाही. सुपर -१२ फेरीतील संघांपैकी २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा मार्ग कठीण होऊ शकतो.

२)भारतीय संघावर लागू शकते बंदी 

जर भारतीय संघाने हा सामना खेळण्यास नकार दिला तर भारतीय संघ दोन गुण गमावणार यासह आयसीसीतर्फे बंदी घालण्यात येऊ शकते.आयसीसीने जर बंदी घातली तर बीसीसीआयचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. असे जर झाले तर जगातील सर्वात श्रीमंत बोर्डापैकी एक बोर्ड असताना देखील बीसीसीआय काहीच करू शकणार नाही.

३) बीसीसीआयचे होऊ शकते मोठे नुकसान 

भारत पाकिस्तान सामन्याची गेली कित्येक महिन्यांपासून वाट पाहिली जात आहे. हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येत असतात. त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. या सामन्यातून बीसीसीआयला कोट्यवधी रुपयांची कमाई होत असते. तसेच यंदा या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयने केले आहे. त्यामुळे भारतीय संघाचे न खेळणे योग्य नसेल.

४)अंतिम सामन्यात किंवा उपांत्य फेरीच्या सामन्यात बीसीसीआय काय करणार?

भारतीय संघाला या स्पर्धेत विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यामुळे हे तर निश्चित आहे की, भारतीय संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश करेल. मात्र समजा, पाकिस्तान संघ देखील अंतिम सामन्यात पोहोचला तर भारतीय संघाला तो सामना कुठल्याही परिस्थितीत खेळावा लागेल. कारण त्या सामन्यातून माघार घेतली तर, पाकिस्तान संघ विजयी होऊ शकतो.

सामना खेळून पराभूत करणे असेल योग्य निर्णय

जर भारताने हा सामना खेळला आणि पाकिस्तानला पराभूत केले, देशवासीयांना आनंद होऊ शकतो. मात्र, सामना रद्द केला तर पाकिस्तान संघ आणखी खुश होईल. पाकिस्तान संघाला देखील तेच हवे आहे. कारण, आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाकिस्तान संघाला एकाही सामन्यात विजय मिळवण्यात आला नाहीये.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---