आयपीएलच्या सुरूवातीपासूनच या स्पर्धेवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात ब्रेंडन मॅक्यूलमने ताबडतोड फलंदाजीने आयपीएलची सुरुवात केली होती. या स्पर्धेमध्ये जगभरातील स्फोटक फलंदाज पाहायला मिळाले. आयपीएलच्या प्रत्येक संघातही तुफानी फलंदाजी करणारे फलंदाज आहेत.
आयपीएलमध्ये दरवर्षी काही नवे विक्रम केले जातात, त्यातील एक विक्रम सर्वात वेगवान अर्धशतकाचा आहे. आयपीएलच्या इतिहासातील वेगवान अर्धशतकाचा विक्रम किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल यांच्या नावावर आहे. २०१८ मध्ये राहुलने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. राहुलने त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ६ षटकार लगावले. या हंगामाबद्दल सांगायचे तर या हंगामातही आपल्याला काही शानदार डाव पाहायला मिळाले.
या लेखाच्या माध्यमातून त्या ४ फलंदाजांविषयी बोलणार आहोत ज्यांनी या हंगामात वेगवान अर्धशतक ठोकले आहेत.
४. मार्कस स्टोईनिस – २० चेंडू
दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू मार्कस स्टोईनिस याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात वेगवान अर्धशतक झळकावले आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध २० सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात स्टोनिसने हे अर्धशतक झळकावले होते. स्टोनिसने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या डावात स्टोनिसने ७ चौकार आणि ३ षटकार लगावले होते.
३. कायरन पोलार्ड – २० चेंडू
मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. या हंगामात आयपीएलमधील वेगवान अर्धशतक झळकाविण्याच्या बाबतीत पोलार्ड तिसर्या क्रमांकावर आहे. पोलार्डने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ६० धावांची खेळी केली आणि अवघ्या २० चेंडूत अर्धशतक ठोकले. या डावात पोलार्डने ३ चौकार आणि ५ षटकार लगावले.
२. संजू सॅमसन – १९ चेंडू
या हंगामात आयपीएलचे दुसरे वेगवान अर्धशतक प्रतिभावान विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने ठोकले आहे. वेगवान खेळी करताना सॅमसनने चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध दुसरे वेगवान अर्धशतक झळकावले. सॅमसनने या खेळीने आपल्या संघाला आश्चर्यकारक विजय मिळवून दिला आणि अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. सॅमसनने ७६ धावांच्या खेळीत १ चौकार व ९ षटकार ठोकले.
१. निकोलस पूरन – १७ चेंडू
किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज निकोलस पुराणने इंडियन प्रीमियर लीगच्या या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे. या आयपीएलमध्ये त्याने पहिल्याच चेंडूवर फटकेबाजी करण्याची क्षमता असल्याचे दाखवले. पूरनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या १७ चेंडूत हा पराक्रम केला. पूरणने या सामन्यात एकूण ७७ धावा केल्या आणि या खेळीत त्याने ५ चौकार आणि ७ षटकार लगावले. पुराणचा हा विक्रम हंगामाच्या शेवटपर्यंत कायम राहणार आहे का हे पाहणे बाकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वडिलांच्या अंत्यसंस्काराला दुबईत असलेला आयपीएल स्टार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी
हेल्मेटवर चेंडू लागल्याने विजय शंकर मैदानावरच कोसळला अन् चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला
Video: अफलातून! पंजाबच्या धुरंदराने चपळाई दाखवत ‘दबंग’ पांडेला धाडलं तंबूत
ट्रेंडिंग लेख –
कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ