---Advertisement---

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मांडल्या ‘या’ चार महत्त्वाच्या गोष्टी

On: रविवार, ऑक्टोबर 24, 2021 12:11 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर १२ सामन्यांचे बिगुल वाजले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शनिवारी (२३ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा संघ विश्वचषकात भारताविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे अजिबात चिंतित नसून सध्या शांत राहण्याचा प्रयत्न करत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चढाओढ सर्वश्रुत आहे. परंतु पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध विश्वचषकात कधीही विजय नोंदवू शकलेला नाही. टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकातील भारताविरुद्धचे सर्व १२ सामने त्यांनी गमावले आहेत. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत दोन्ही संघ रविवारी (२४ ऑक्टोबर) आमनेसामने येतील. सामन्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या:

१. मूलभूत गोष्टींवर असेल भर
सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बाबर म्हणाला, ‘खरं सांगायचं तर आम्हाला आधीच्या सामन्यांवर लक्ष केंद्रित करायचं नाही. आम्ही या विश्वचषकाचा विचार करत आहोत. आम्ही आमची ताकद आणि क्षमता यावर लक्ष केंद्रित करू आणि सामन्यादरम्यान त्याचा वापर करू इच्छितो.

यावर्षी टी२० मध्ये दोन शतके झळकावणारा बाबर म्हणाला, गोष्टी सोप्या ठेवणे आणि मूलभूत गोष्टींला चिकटून राहणे महत्त्वाचे आहे. आम्ही चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू आणि चांगला निकाल मिळवू. दोन्ही शेजारी देशांमधील तणावामुळे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. दोन्ही संघांमधील शेवटचा सामना इंग्लंडमध्ये २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यादरम्यान झाली.

२. सामन्यादरम्यान स्वतःला शांत ठेवणे गरजेचे असेल
बाबर म्हणाला, ‘आम्ही खूप स्पर्धा खेळल्या आहेत, आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही चांगली कामगिरी केली होती. आम्ही गोष्टी जितक्या सोप्या ठेवू तितक्या त्या चांगल्या राहतील. हे फक्त मूलभूत गोष्टींना चिकटून राहिले पाहिजे आणि त्याच वेळी शांत मन ठवणे देखील गरजेचे असेल. तो म्हणाले, ‘आमची तयारी चांगली झाली आहे.आम्हाला सामन्याच्या दिवशी चांगले क्रिकेट खेळण्याची आशा आहे.’

३. म्हणून शोएब मलिकची निवड केली
माजी कर्णधार सरफराज अहमदला सोडून शोएब मलिकला प्राधान्य देण्याचा मोठा निर्णय पाकिस्तानच्या कर्णधाराने घेतला आहे. बाबार म्हणाला, ‘सरफराज हा फिरकीचा चांगला खेळाडू आहे आणि भारताविरुद्ध खेळण्याचा चांगला अनुभव आहे. पण आम्हाला वाटते की या सामन्यासाठी मलिकचे प्लेइंग इलेव्हनमध्ये असणे योग्य ठरेल.’

बाबर म्हणाला, ‘शोएब मलिक फ्रंट फूटवर खूप चांगला खेळतो आणि फिरकीचा सामना देखील खूप चांगला करतो. म्हणूनच आम्ही त्यांची निवड केली आहे. सरफराजला येत्या सामन्यांमध्ये नक्कीच संधी मिळेल.’

४. एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणार
बाबर म्हणाला, ‘स्पर्धेतील पहिला सामना हा नेहमीच महत्त्वाचा असतो आणि आम्ही एका चांगल्या प्रारंभाची अपेक्षा करत आहोत आणि तीच लय संपूर्ण स्पर्धेत ठेवण्याचा प्रयत्न करू. मला माझ्या संघाच्या संयोजनावर पूर्ण विश्वास आहे.’ बाबर म्हणाला. ‘एकावेळी एका सामन्यावर आमचे लक्ष असेल.’

महत्त्वाच्या बातम्या – 

“मी आधीच खूप काही बोललो, आता अजून काही सांगण्याची गरज नाही,” कर्णधारपद सोडण्याच्या प्रश्नावर संतापला विराट

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटचा माइंड गेम; म्हणाला, ‘वातावरण बदलेल, पण तयारीवर परिणाम नाही’

सुरमा मार्करम! पहिल्याच सामन्यात टिपला नजरेचे पारणे फेडणारा झेल; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---