---Advertisement---

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

---Advertisement---

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक ठोकणे तशी अवघड गोष्ट असते आणि जर सर्वात वेगाने शतक करण्याबद्दल बोलायचे झाले, तर फलंदाजाला एक वेगळ्या अंदाजात फलंदाजी करावी लागते. टी-20 क्रिकेटमध्ये कमी चेंडूमुळे आक्रमक पद्धतीने खेळाडू फलंदाजी करतात. मात्र वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांकडे पर्याप्त चेंडू असतात. यामुळे या प्रकारात सर्वात वेगाने शतक ठोकणे महत्वाची बाब असते.

भारतीय संघाच्या बर्‍याच फलंदाजांनी वनडेत कित्येक देशाविरुद्ध वेगाने शतके ठोकली आहेत. परंतु विरुद्ध संघातील खेळाडूंनीसुद्धा भारता विरुद्ध खेळताना वेगवान शतके केली आहेत. त्यामुळे या लेखात आपण भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतके करणार्‍या 4 फलंदाजांबद्द्ल जाणून घेणार आहोत.

5. स्टीव्ह स्मिथ (62) 2020*

शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने चमकदार सुरुवात करताना उत्कृष्ट खेळी केली. त्याने डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर फलंदाजीला येत मनगटाचा चांगल्या पध्दतीने वापर करताना मैदानाच्या चारही बाजूला फटके मारले.

स्मिथने केवळ 62 चेंडूत शतक ठोकले. स्मिथच्या या खेळीत 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. भारताविरूद्ध वनडेत हे पाचव्या क्रमांकाचे वेगवान शतक आहे .

4. एबी डिविलियर्स (58) 2010

सन 2010 मध्ये भारताविरुद्ध वनडे मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलियर्सने जबरदस्त खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एबी डिविलियर्सने फक्त 58 चेंडूत शतक ठोकले होते. त्याच्या या खेळीत 11 चौकार अणि 3 षटकारांचा समावेश होता.

त्यामुळे त्याचे हे वनडे शतक भारताविरुद्ध झळकवलेले चौथ्या क्रमांकाचे वेगवान शतक आहे.

3. एबी डिविलियर्स (57) 2015

मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिविलियर्सने सन 2015 ला देखील भारताविरुद्ध तुफानी शतकी खेळी केली होती. त्याने मुंबईमध्ये पाचव्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून 57 चेंडूत शतक झळकावले होते. त्या सामन्यात त्याने एकूण 3 चौकार आणि 11 षटकरांच्या मदतीने 61 चेंडूत 119 धावांची खेळी केली होती. त्याचे हे शतक भारताविरुद्ध केलेले तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान वनडे शतक आहे.

2. जेम्स फाॅकनर (57) 2013

सन 2013 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात रोहित शर्माने द्विशतकीय खेळी केली होती. त्यामुळे हा सामना सर्वांच्यात लक्षात आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघाला 384 धावांचे आव्हान दिले होते.

त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अष्टपैलू जेम्स फाॅकनरने फलंदाजीला येत फक्त 57 चेंडूत शतक ठोकले होते. जेम्स फाॅकनरने 73 चेंडूचा सामना करताना 116 धावांची खेळी साकारली होती. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 6 षटकार लगावले होते. त्यामुळे तो भारताविरुद्ध कमी चेंडूत शतक करणार्‍या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे .

1. शाहिद आफ्रिदी (45) 2005

सन 2005 साली भारताच्या दौर्‍यावर आलेल्या पाकिस्तानकडून वनडे मालिकेतील पाचव्या सामन्यात शाहिद आफ्रिदीने एक दमदार खेळी केली होती. आपल्या विस्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असणार्‍या शाहिद आफ्रिदीने केवळ 45 चेंडूत शतक ठोकले होते. शाहिद आफ्रिदीने आपल्या या खेळीत 10 चौकार 9 षटकार ठोकले होते. भारता विरुद्ध ठोकलेले हे वेगवान वनडे शतक आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘आम्हाला **** फरक पडत नाही’, भारतीय दिग्गजाने घेतला पाकिस्तानी पत्रकाराचा समाचार

Video – भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान डेविड वॉर्नरचे साऊथ इंडियन गाण्यावर थिरकले पाय

‘असा’ कारनामा करणारा फर्ग्यूसन न्यूझीलंडचा केवळ दुसराच गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---