किंग्स इलेव्हन पंजाब हा आयपीएलमधील असा संघ आहे, ज्याचा इतिहास जास्त विशेष राहिला नाही. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सहसंघमालक असलेल्या पंजाब संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही. २०१४मध्ये त्यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यांपर्यंत मजल मारली होती. परंतु, कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना पराभूत करत त्यांची पहिल्यांदा विजेता बनण्याची संधीदेखील हिरावून घेतली.
असे असले तरी, प्रत्येक हंगामाप्रमाणे या हंगामातही किंग्स इलेव्हन पंजाब आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न मनात घेऊन मैदानावर उतरेल. विशेष म्हणजे, यंदा त्यांच्याकडे काही चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत, ज्या त्यांना आयपीएलच्या विजेत्या पदावर मोहर लावण्यात उपयोगी ठरु शकतात. या लेखात, त्या ४ कारणांचा आढावा घेण्यात आला आहे.
चार कारणे, ज्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाब यंदा पटकावू शकतो आयपीएल ट्रॉफी – 4 Reasons Why Kings Xi Punjab Have Chance To Win Ipl 2020
४. संघाकडे उपलब्ध आहेत विस्फोटक फलंदाज –
किंग्स इलेव्हन पंजाब संघ यंदा जास्त मजबूत असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण, त्यांच्या संघातील विस्फोटक फलंदाजी क्रम असल्याचे दिसत आहे. यंदा पंजाबकडे बरेच विस्फोटक फलंदाज उपलब्ध आहेत, ज्यांना टी२० स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जाते.
सलामीला फलंदाजी करण्यासाठी कर्णधार केएल राहुल आणि ख्रिस गेल ही विस्फोटक जोडी उपलब्ध आहे. तर, मधल्या फळीसाठी ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन आणि जेम्स नीशम हे टी२० स्पेशलिस्ट आहेत. या सर्व फलंदाजांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. या फलंदाजांमध्ये त्यांच्या फलंदाजी प्रदर्शनाच्या जोरावर संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे निश्चितपणे यावेळी किंग्स इलेव्हन पंजाबची सर्वात मोठी मजबूती हा त्यांचा विस्फोटक फलंदाजी क्रम असेल. जर, हे सर्व फलंदाज युएईच्या मैदानावर टिकले, तर कमाल करुन दाखवू शकतात.
३. युएईत संघाचा १०० टक्के सामने जिंकण्याचा रिकॉर्ड –
सर्वांना ऐकून आश्चर्य होईल, पण एकदाही आयपीएल ट्रॉफी न पटकावणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबचा युएईमध्ये सामने जिंकण्याचा रेकॉर्ड १०० टक्के आहे. विशेष म्हणजे, आयपीएलचा १३वा हंगाम युएईमध्येच खेळला जाणार आहे. त्यामुळे पंजाबसाठी ही सर्वात मोठी संधी आहे.
२०१४ साली भारतात निवडणूका चालू असल्यामुळे आयपीएलचे काही सामने युएईमध्ये खेळले गेले होते. त्यावेळी किंग्स इलेव्हन पंजाबने युएईमध्ये ५ सामने खेळले होते आणि सहजरित्या पाचही सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे युएईमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबची विजयी सरासरी १०० टक्के इतकी आहे. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबला युएईत आयपीएल २०२० खेळले जाण्याचा पूरेपूर फायदा होऊ शकतो.
२. संघाकडे उपलब्ध आहे शानदार संघ व्यवस्थापन –
किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएल २०२० साठी नव्या संघ व्यवस्थापनाची निवड केली आहे. सध्या त्यांचे मुख्य प्रशिक्षक हे भारताचे माजी प्रशिक्षक आणि गोलंदाज अनिल कुंबळे हे आहेत. तर, त्यांनी जुने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक क्रेग मॅकमिलन यांना त्यांच्या पदावरून हटवून जोंटी रोड्स यांची निवड केली आहे.
तसेच, पंजाबचे जुने गोलंदाजी प्रशिक्षक रयान हॅरिस यांच्या ठिकाणी वेस्ट इंडिजच्या कर्टनी वॉल्श यांची निवड करण्यात आली आहे. तर, फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचे देशांतर्गत स्टार क्रिकेटपटू वसीम जाफर यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना क्रिकेट इतिहासातील सर्वात बुद्धिमान खेळांडूमध्ये गणले जाते. त्यामुळे या चौघांच्या बुद्धिमत्तेचा संघाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
१. संघात अनेक शानदार टी२० अष्टपैलू क्रिकेटपटूंची उपस्थिती –
किंग्स इलेव्हन पंजाबच्या मजबूतीचे अजून एक कारण म्हणजे त्यांच्या संघातील दमदार अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. विशेषत: हे क्रिकेटपटू टी२० स्पेशलिस्ट आहेत. यामध्ये क्रिस जोर्डन, जेम्स नीशम आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे. तर, दक्षिण आफ्रिकाच्या हार्डस विलोजेनने मागच्या हंगामात उल्लेखनीय अष्टपैलू प्रदर्शन केले होते.
तसेच, दक्षिण आफ्रिकाच्या अष्टपैलू कृष्णप्पा गॉथमला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड करुन संघात घेण्यात आले आहे. तसेच संघाकडे दर्शन नाल्डांडे, हरप्रीत बरार, रवि बिश्नोई, तजिंदर सिंग ढिल्लन असे देशांतर्गत अष्टपैलू क्रिकेटपटू उपलब्ध आहेत. या अष्टपैलूंच्या कामगिरीच्या जोरावर संघ आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घालू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
एकाही खेळाडूने आयपीएलमध्ये ठोकले नाही शतक, या ५ खेळाडूने केल्यात सर्वोच्च धावा
आयपीएलमध्ये कशीही कामगिरी केली तरी या ५ खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात संधी नाही
४ अशी कारणे, ज्यामुळे श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स दुबई जिंकणारचं
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट जगतातील सर्वात सभ्य गृहस्थाची गोष्ट, नाव आहे केन विल्यमसन
फक्त २४ खेळाडूंना घेऊन जाता येणार दुबईला, या टीमला वगळावे लागणार प्रत्येकी एका खेळाडूला
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड पाकिस्तान कसोटीची नक्की काय आहे अवस्था, वाचा थोडक्यात