मंगळवारी (८ फेब्रुवारी) क्रीडाविश्व आणि मनोरंजन विश्वासाठी एक दु:खद बातमी समोर आली, ती म्हणजे माजी ऑलिम्पिकपटू आणि अभिनेते प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचे निधन झाले आहे. मूळचे पंजाबमधील तरणतारणचे असलेल्या प्रवीण यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी दिल्लीतील अशोक विहार येथे त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समजत आहे.
प्रवीण कुमार सोबती यांनी भारताचे ६० आणि ७० च्या दशकात एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्त्व केले होते. ते हातोडा फेक आणि थाळी फेक हे खेळ खेळायचे. त्यांनी हातोडा फेक आणि थाळी फेक या क्रीडा प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधत्त्व करताना एशियन गेम्समध्ये २ सुवर्णपदके, १ रौप्यपदक आणि १ कांस्यपदक जिंकले आहे (Asian Games medalist). तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक जिंकले आहे.
त्यांनी १९६६ आणि १९७० साली बँकॉक येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपद जिंकले होते. तसेच त्यांनी १९६६ सालीच एशियन गेम्समध्ये हातोडा फेकमध्ये कांस्य पदक जिंकले होते, तर १९७४ साली तेहरानमध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये त्यांनी थाळीफेकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. याशिवाय त्यांनी १९६६ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेत हातोडाफेकमध्ये रौप्यपदक आपल्या नावावर केले होते. इतकंच नाही तर १९६८ साली मेक्सिको ऑलिम्पिक आणि १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांना १९६७ साली अर्जून पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वयाच्या २० व्या वर्षी प्रवीण सोबती सीमा सुरक्षा दलात (BSF) सामील झाले होते. बीएसएफने देखील ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Director General & All Ranks of BSF condole the untimely demise of Sh Praveen Kumar Sobti, former Deputy Commandant, Arjuna Awardee, two-time Olympian (1968 Mexico Games and 1972 Munich Games) & four-time Asian Games medallist (2 gold, 1 silver and 1 bronze).#JaiHind#RIP pic.twitter.com/NPsqCjhou7
— BSF (@BSF_India) February 8, 2022
अभिनय क्षेत्रातही विशेष काम
प्रवीण यांनी खेळात कारकिर्द घडल्यानंतर अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. त्यांचे प्रसिद्ध दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेमधील ‘भीम’ हे पात्र विशेष गाजले. त्यांनी ३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
महत्त्वाच्या बातम्या –
रणजी स्पर्धेत अजिंक्य रहाणे खेळणार पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली? जाणून घ्या सविस्तर
आता हॉकी खेळणार भारतीय संघातील विस्फोटक फलंदाज, वर्ल्डकप स्पर्धेतून मिळाला होता डच्चू
कायरन पोलार्ड स्लेज करत सूर्यकुमारला काय म्हणाला होता? स्वतः सूर्यकुमारने केला खुलासा