जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यावर्षी म्हणजेच आयपीएल २०२० यूएई मध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. आयपीएलमधील आठही संघ सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. जेणेकरून ते आयपीएल चषक आपल्या संघाच्या नावावर होईल. परंतु, जर आयपीएलच्या सर्वोत्कृष्ट संघाबद्दल चर्चा केली, तर तो संघ म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ.
मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात असलेल्या संघाने २०१९ च्या हंगामात चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद नोंदविले. या संघातील खेळाडूंनीही मुंबईला चार वेळा आयपीएलचे विजेतेपद देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू मुंबई संघात खेळले आहेत. त्यातील बरेच खेळाडू अद्याप संघात उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक टी२०तील दिग्गज खेळाडू मुंबई इंडियन्स संघात आल्यानंतर फ्लॉप ठरले आहेत.
या लेखात तुम्हाला मुंबई इंडियन्सशी संबंधित अशा ४ टी-२० क्रिकेट दिग्गजांबद्दल सांगणार आहोत, जे आयपीएलमध्ये मुंबईसाठी खेळताना फ्लॉप ठरले आहेत.
हे ४ मोठे खेळाडू मुंबई इंडियन्सकडून झाले फ्लॉप
४. युवराज सिंग (Yuvraj Singh)
टी-२० क्रिकेटमध्ये ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखला जाणारा, माजी अष्टपैलू फलंदाज युवराज सिंगला मुंबई इंडियन्स संघाकडून फारसे काही करता आले नाही. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील युवराज सिंगचा शेवटचा संघ होता.
युवराज सिंगला मुंबई इंडियन्सने १ कोटी रुपयात विकत घेतले होते. युवराज सिंग हा मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील जबरदस्त फलंदाज असल्याचे सिद्ध होईल आणि बऱ्याच धावा करेल असा अंदाज वर्तविला जात होता पण तसे झाले नाही.
युवराज सिंग आयपीएलमध्ये मुंबई संघाकडून फक्त ४ सामने खेळू शकला आणि त्यात त्याने फक्त ९८ धावा केल्या. त्यानंतर त्याला संघातून काढण्यात आले. तसेच युवीने कॅनडा लीगमध्येही भाग घेतला. टी-१० लीगमध्येही त्याने आपली उपस्थिती दाखवली.
३. ऍरोन फिंच (Aaron Finch)
२०१५ च्या आयपीएल हंगामात ऍरोन फिंचला मुंबई इंडियन्सने ३.२ कोटींमध्ये खरेदी केले होते, त्या आधी तो ४ संघाकडून खेळला होता. मुंबई इंडियन्सला आशा होती की टॉप ऑर्डरमध्ये फिंच संघाला जबरदस्त खेळीसह शानदार सुरुवात देईल.
मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. फिंचने मुंबई इंडियन्सकडून फक्त ३ सामने खेळले त्यात त्याला ५, ८ आणि १० धावा काढण्यात यश आले. फिंच मुंबई इंडियन्ससाठी स्पेशल फ्लॉप ठरला हे सिद्ध होते.
त्याच्या टी-२० क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याला टी-२० क्रिकेट दिग्गजांमध्ये स्थान देण्यात आले आहे. या स्वरूपामध्ये त्याचा उत्कृष्ट फॉर्म हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे. टी-२० क्रिकेटमध्ये फिंचच्या दोनशे धावा आहेत पण मुंबई इंडियन्स संघाकडून तो यशस्वी झाला नाही.
२.ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)
ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियामधील एक स्फोटक अष्टपैलू खेळाडू आहे. तो फक्त तुफानी फलंदाजी करत नाही तर आपल्या फिरकी गोलंदाजीसाठीही ओळखला जातो. टी-२० क्रिकेट हे मॅक्सवेलचे आवडते स्वरूप आहे.
कारण हे स्वरूप त्यांच्या स्फोटक फलंदाजीला शोभते. मात्र, हा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठीही फ्लॉप ठरला. २०१३ च्या आयपीएल लिलावात ग्लेन मॅक्सवेलला मुंबई इंडियन्सने दहा लाख डॉलर्समध्ये विकत घेतले होते.
प्रचंड रक्कम खर्च करुनही ग्लेन मॅक्सवेलने मुंबईकडून केवळ ३ सामने खेळले, त्यामध्ये त्याने फक्त ३६ धावा केल्या. त्याशिवाय त्याने २ षटके गोलंदाजी केली ज्यामध्ये त्याने २३ धावा दिल्या.
१. मार्टिन गप्टिल (Martin Guptill)
आयपीएल २०१६ मध्ये न्यूझीलंडचा धुवांधार फलंदाज मार्टिन गप्टिल सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसला. गप्टिलची आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द उत्कृष्ट आहे. गप्टिलने ८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १३४.६१ च्या शानदार स्ट्राईकसह २५३६ धावा केल्या आहेत. यात त्याने २ शतकेही ठोकली आहेत. ही आकडेवारी खूप प्रभावी आहे. परंतु हा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठीही फ्लॉप ठरला.
आयपीएल २०१७ मध्ये लेंडल सिमन्सच्या जागी मार्टिन गप्टिलला मुंबई इंडियन्स संघात घेण्यात आले. त्यावेळी लेंडल सिमन्स उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, परंतु दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर पडावे लागले. लेंडलची जागा घेणाऱ्या गप्टिलने मुंबईकडून ७ सामने खेळले असून त्यात २२ च्या सरासरीने त्याने १३२ धावा केल्या.
आयपीएल कारकिर्दीच्या बाबतीत, त्याने आयपीएलमध्ये केवळ १३ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १३७.७५ च्या स्ट्राईकने केवळ २७० धावा केल्या आहेत. मार्टिन गप्टिलचा आयपीएलचा मागील हंगामही चांगला नव्हता आणि त्याने फक्त ३ सामने खेळले आणि केवळ ८१ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील,” बजरंग पुनिया
विराट-धोनी सारखे दिग्गजही युएईत ठरलेत फ्लॉप, पण ‘या’ ३ कर्णधारांनी नोंदवलाय हा खास विक्रम
आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप
श्रीलंका संघाने तब्बल २७१ ओव्हर्स खेळल्या होत्या व भारतीय गोलंदाज फक्त रडायचे बाकी होते
वाढदिवस विशेष: अफाट लोकप्रियतेचा धनी ठरलेला पण तितकाच वादग्रस्त जेसी रायडर