भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात नाबाद ६३ धावांची खेळी केली आहे.
याबरोबर विराटने एक खास विक्रही केला आहे. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ४०० धावा करणारा तो दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे.
यापुर्वी हा पराक्रम मोहम्मद अझरुद्दीनने केला होता. अझरने १९९०च्या दौऱ्यात ४२६ धावा केल्या होत्या.
विराटने या दौऱ्यात तीन कसोटीतील ६ डावात ८०.४०च्या सरासरीने ४०३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या तीन अर्धशतके आणि एक शतकाचा समावेश आहे.
२०१४ला विराटने १० डावात १३.४०च्या सरासरीने १३४ धावा केल्या होत्या.
तसेच भारतीय संघाने आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिका देशांत मिळुन ज्या ७ शतकी भागीदारी केल्या आहेत त्यातील ६मध्ये विराटचा समावेश होता.
या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादीत ४०३ धावांसह विराट अव्वल असुन दुसऱ्या स्थानावर असलेल्या जाॅनी बेअरस्ट्रोने २०६ धावा केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स कबड्डीत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा निराशाजनक पराभव
–एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक
–एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक