आशिया चषक 2023 बुधवारी (30 ऑगस्ट) सुरू होत आहे. यावर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आशिया चषक देखील वनडे प्रकारात आयोजित केला गेला आहे. वनडे प्रकारात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत फलंदाजांसह गोलंदाजांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे. आपण या लेखात वनडे आशिया चषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांवर नजर टाकणार आहोत.
यावर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण अवघ्या चार सामन्यांचे आयोजित पाकिस्तानध्ये केले गेले आहे. अशात यजमान संघाला देखील श्रीलंकेत काही सामने खेळावे लागणार आहेत. आशिया चषक आशियाई देशांमध्ये महत्वाची क्रिकेट स्पर्धा असून यंदा या स्पर्धेचा 14 वा हंगाम आहे.
रविंद्र जडेजा –
आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आणि अजूनही खेळणाऱ्या गोलंदाजांचा विचार केला, तर रविंद्र जडेजाचे नाव पहिल्यांदा येते. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारतीय संघाचा सर्वात महत्वाचा अष्टपैलू असून आघामी आशिया चषकात त्याची भूमिका महत्वाची असणार आहे. जडेजाने आशिया चषकात आतापर्यंत 14 सामने खेळले गेले असून यात 19 विकेट्स घेतल्या आहेत.
शाकिब अल हसन –
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याचे नाव देखील रविंद्र जडेजा याच्यासह संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. शाकिबने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 19 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
रविचंद्रन अश्विन आणि शोएब मलिक –
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने वनडे आशिया चषकात आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानचा दिग्गज शोएब मलिक राष्ट्रीय संघाचा नियमित खेळाडून नसला, तरी त्याने अद्याप निवृत्तीची घोषणा केली नाहीये. मलिकने वनडे आशिया चषकात आतापर्यंत 17 सामने खेळले असून 12 विकेट्स घेतल्या आहेत. हे दोन्ही खेळाडू सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहेत आणि आगामी आशिया चषकात खेळताना दिसणार नाहीत.
राशिद खान आणि मुस्तफिजूर रहमान –
अफगाणिस्तानचा राशिद खान (Rashid Khan) याचेही आकडे अप्रतिम आहेत. अफगाणिस्तानच्या या माजी कर्णधाराने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 10 विकेट्स नावावर केल्या आहेत. बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान (Mustafizur Rahman) यानेही वनडे प्रकारातील आशिया चषक गाजवला आहे. त्याने वनडे आशिया च,कात खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत.
कुलदीप यादव –
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला बहुतांश वेळा निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाकडून दुर्लक्षीत केल्याचे पाहायला मिळाले आहे. असे असले तरी, आगामी आशिया चषकासाठी कुलदीपला भारतीय संघात स्थान दिले गेले आहे. यापूर्वी वनडे आशिया चषकात त्याने 6 सामने खेळले असून त्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.
(5 active players who took most wickets in Asia Cup, Indian spinner on top)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकाच्या एक दिवस आधी श्रीलंकन संघाची घोषणा, प्रमुख खेळाडू संघातून बाहेर
राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळणार, आशिया चषकात काय निर्णया घेणार संघ व्यवस्थापन?