“बाबू मोशाई, ज़िंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं”, हा डायलॉग सर्वात उल्लेखनीय डायलॉग्जपैकी एक आहे, जो आतापर्यंतच्या प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक असणाऱ्या आनंद या चित्रपटातील आहे. जर याला मराठीमध्ये अनुवादित केले तर ढोबळमानाने याचा अर्थ असा होतो की आयुष्य खूप वर्षे असण्यापेक्षा थोडंसच असावं पण दिमाखदार असावं.
अगदी या वाक्यप्रमाणेच क्रिकेट हा बऱ्याच कौशल्यांची गरज असणारा खेळ आहे. तुम्ही मैदानात आहात याची अनुभूती येण्याआधीच तुमचे कारकिर्द थांबू शकते. आपण एका अनिश्चितेतच्या युगात जगत आहोत, जिथे आपल्याला पुढे काय होणार आहे याची शाश्वतता नसते या गोष्टीचा विचार करता एखाद्याची कारकिर्द संपण्याची अनेक कारणे असू शकतात.
असे असले तरी काही क्रिकेटपटू मैदानात अजूनही टिकून आहेत आणि आपल्या छोटयाश्या कारकिर्दीत खेळाच्या पूर्ण प्रतिमानाच्या पात्रतेत उतरण्यात यशस्वी ठरले आहेत. या गोष्टीत आपण अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची कारकीर्द लहान होती मात्र त्यांनी राजासारखे जीवन जगले.
1. फिल ह्यूजेस
फिल ह्यूजेसने युवा गोलंदाज सीन एबॉटचा वेगवान बाउन्सर खाल्ला आणि तो धारातीर्थी पडला, यातच त्याला आपला जीव गमवावा लागला. भरीस भर म्हणजे हे घडले त्याच्या २६ व्या वाढदिवसाच्या केवळ एक आठवड्याआधी. जेव्हा ही दुर्घटना समोर आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजाच्या प्रभावशाली प्रदर्शनामुळे आता कुठे त्याचे करिअर बहरत होती, अशावेळी ही दुर्घटना घडली. आपल्या छोट्याश्या करिअरमध्ये त्याने २६ कसोटी सामने खेळले, ज्यात १५३२ धावा काढल्या. तर २५ एकदिवसीय सामन्यांत ८२६ धावा बनवले. फिल ह्यूजेसकडे एक आदर्शवादी तंत्रशुद्ध शैली होती, ज्यामुळे त्याची तुलना ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर जस्टिन लैंगर यांच्याशी केली जात होती.
2. इरफान पठान
इरफान पठान, एक असा क्रिकेटपटू ज्याने वर्षानुवर्षे प्रतिध्वनीत होऊ शकलं असतं. कारण त्या काळात भारतीय गोलंदाजांनी स्विंग करणे म्हणजे दुर्लभ गोष्ट मानली जायची. तेव्हा इरफान पठणाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. ते २००७ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे ‘मॅन ऑफ द मॅच’ राहिलेले आहेत. यात त्यांनी पाकिस्तानच्या फलंदाजी फळीचे कंबरडे मोडताना महत्वपूर्ण ३ बळींचा समावेश होता, ज्यात शाहिद आफ्रिदीच्या ‘गोल्डन डक’चा सुद्धा समावेळ होता.
आपल्या प्रभावशाली गोलंदाजीसोबतच त्यांनी सुरेख फलंदाजीचे सुद्धा प्रदर्शन केले. त्या वेळच्या भारताच्या संघाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपलच्या मते इरफान पठाण एक उत्कृष्ट फलंदाज सुद्धा बनू शकतो. परंतु त्याला फलंदाजीसाठी तयार करण्याच्या प्रयत्नात त्याच्या गोलंदाजीकडे दुर्लक्ष झाले. एखाद्या खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्द मोजमापात किमान ३५० सामने खेळले आहेत का, याचा विचार केला जातो. परंतु इरफानचे छोटेसे करिअर १७५ सामन्यांपर्यंतच मर्यादित राहिले.
3 शॉन टेट
आणखी एक प्रभावशाली क्रिकेटपटू, जे दुखापतींच्या कारणास्तव आपली क्षमता पूर्णपणे दाखवू शकले नाहीत, ते म्हणजे शॉन टेट. एक अपरंपरागत प्रतिभा असणारा खेळाडू अखेर रसातळाला गेला. दुर्दैवाची बाब म्हणजे हे घडले केवळ त्याच्याकडून केल्या गेलेल्या अतिरिक्त गतीच्या मागणीमुळे. आपल्या लाइन आणि लेन्थवर लक्ष देण्याऐवजी त्याने आपली गती वाढवण्यावर भर दिला. यामुळे दुखापतींच्या कारणांमुळे त्याचे करिअर वेळेआधीच समाप्त झाले. त्याने ५९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत ९५ बळी घेतले.
4. सोहेल तनवीर
सोहेल तनवीर आपल्या अपरंपरागत व वेगळ्या गोलंदाजीच्या शैलीमुळे तसेच अखेरच्या षटकांत गोलंदाजी करण्याच्या कौशल्यामुळे हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध होता. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच्या करिअरने अचानक खराब वळण घेतले. पाकिस्तानसाठी केलेल्या आपल्या प्रदर्शनात तो १३० आंतरराष्ट्रीय बळी घेण्यात यशस्वी ठरला. आकड्यांपेक्षा त्याचा खेळवरचा प्रभाव जास्त होता. त्याची गणना अशा खेळाडूंमध्ये व्हायची जे पाकिस्तानला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतील आणि या बाबतीत तो बऱ्याच अंशी यशस्वी सुद्धा ठरला.
5 रिकार्डो पॉवेल
रिकार्डो पॉवेल यांच्यासाठी वय हे निर्दयी ठरले. कारण त्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत म्हणून त्यांनी भरारी घ्यायला सुरुवात केली. तेच त्यांच्या शरीराने साथ देणे हळूहळू कमी केले. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २१ व्या शतकाच्या सुरुवातीला एक दुर्मिळ गोष्ट कोणती असेल तर, ती म्हणजे १०० चा स्ट्राईक रेट. कॅरेबियन द्वीपकल्पातील या ‘बिग हिटर’ने आपले एकदिवसीय सामन्यांचे करिअर ९६ पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने समाप्त केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता कसं करणार! टी20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचे सराव सामने रद्द, यादीत बलाढ्य संघांचा समावेश
‘आता दुसरं काहीतरी करेलच…’, बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्याविषयी गागुलींची पहिली प्रतिक्रिया